शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख भाविक येण्याचा अंदाज : दत्त यात्रोत्सवासाठी पोलिसांचा वाढीव बंदोबस्त कसबे, मौजे सुकेणेनगरी गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:06 IST

कसबे सुकेणे : प्रतिगाणगापूर म्हणून प्रसिद्ध मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवानिमित्त सुकेणेनगरी भाविक व यात्रेकरूंच्या गर्दीने गजबजली आहे.

ठळक मुद्देयात्रास्थळ व पालखी मार्गाची पाहणी प्रशासनाला भाविकांच्या सुरक्षितेविषयी सूचना

कसबे सुकेणे : येथील ग्रामदैवत भैरवनाथ-जोगेश्वरी आणि प्रतिगाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवानिमित्त कसबे सुकेणे व मौजे सुकेणेनगरी भाविक व यात्रेकरूंच्या गर्दीने गजबजली आहे. यात्रोत्सवात सुमारे दोन लाख भाविक सहभागी होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी यात्रास्थळ व पालखी मार्गाची पाहणी केली असून, नाशिक पोलीस मुख्यालयाकडून वाढीव पोलीस बंदोबस्त मिळाला असल्याची माहिती कसबे सुकेणे पोलिसांनी दिली.देशभरातील महानुभाव पंथियांचे प्रमुख स्थान असलेले मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त मंदिराच्या यात्रोत्सवाला रंगपंचमीपासून प्रारंभ होत आहे. ओझर व कसबे सुकेणेचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, आय. टी. मोरे, रामदास घुमरे, ताराचंद चौवरे यांनी यात्रास्थळाची तसेच पालखी मार्गाची पाहणी करून मंदिर प्रशासनाला भाविकांच्या सुरक्षितेविषयी सूचना केल्या आहेत. मौजे सुकेणे दत्त मंदिरात यात्रा काळात होणारी गर्दी लक्षात घेता दर्शन बारीवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. यात्रेत टवाळखोर, हुल्लडबाजी करणाºया युवकांवर तत्काळ कारवाई केली जाणार असून, मटका, जुगार यासारख्या अवैध धंदे यात्रा काळात आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दत्त मंदिर संस्थानचे महंत मनोहरशास्त्री सुकेणेकर, अर्जुनराज सुकेणेकर,बाळकृष्णराज सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर, गोपीराजशास्त्री सुकेणेकर यांनी पोलीस अधिकाºयांचा दत्त मंदिर आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. दत्त मंदिर संस्थानकडून पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मंदिराला रंगरंगोटी, रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. यात्रेत जिल्ह्यातील अनेक भागातील भाविक सहभागी होतात. भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन दत्त मंदिर संस्थान व मौजे सुकेणेच्या ग्रामस्थांनी केले आहे. मौजे सुकेणे ग्रामपंचायतच्या वतीने यात्रेकरूंना मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार असून, यात्रेतील व्यावसायिकांनी जागेबाबत ग्रामपंचायतीशी संपर्कसाधावा, असे आवाहन सरपंच वृषाली भंडारे, उपसरपंच नंदराम हंडोरे यांनी केले आहे. यात्रा काळात बाणेश्वर मंदिरात जुगार व मटका खेळला जातो. मौजे सुकेणेच्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करीत परिसर सुशोभित केला आहे. मात्र काही टवाळखोरांकडून परिसरात जुगार व मटका खेळला जात असल्याने मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले. पोलिसांनी याबाबत लक्ष घालून छुप्या पद्धतीने होणारे अवैद्य धंदे बंद करावे, अशी मागणी मौजे सुकेणेचे माजी सरपंच सुरेश मोगल यांनी केली आहे.