जुनी शेमळी : गणेश विसर्जनानंतर भाद्रपद महिन्यात घरोघरी गुलाबाईची स्थापना केली जाते. साधारणपणे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तर काही ठिकाणी पंधरा दिवस गुलाबाईची स्थापना केली जाते. शनिवारी कसमादेत उत्साहात गुलाबाईची मनोभावे स्थापना करण्यात आली.अनेक पिढ्यांपासून हा उत्सव परंपरागत चालू आहे. फुलाबाईची बाजारात मुर्ती विकत मिळते मात्र काही जणांकडे आजही मातीपासून फुलाबाईची मूर्ती बनविण्यात येते. मुर्तीस रंग दिले जातात. शिवाय घरोघरी आकर्षक सजावट देखील केली जाते.भाद्रपदाचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला, पार्वती बोले शंकराला, चला आपल्या माहेरी ला.... अशा प्रकारची गुलाबाईची गाणी आनंदाने या काळात गायली जातात. माहेरपण व सासरपणाच जीवनात मराठी, आहिराणी गाणी देखील म्हणतात. त्याचबरोबर आरती झाल्यावर गुलाबाईसाठी आणलेला प्रसाद सर्व मुलींमधून ओळखायचा असतो. त्यानंतर त्याचे वाटप करण्यात येते.साधारणपणे महिनाभर हा उत्सव साजरा केला जातो. तर काही ठिकाणी १५ दिवशी गुलाबाई उत्सव साजरा करण्यात येतो. कोजागिरी पौर्णिमेला विधिवत पूजा करून गुलाबाईची सांगता करून विसर्जन करण्यात येते.(फोटो १७ गुलाबाई)जुनी शेमळी येथेकरण्यात आलेली गुलाबाईच्या मूर्तीची सुंदर अशी केलेली स्थापना.
गुलाबाईची कसमादेत घरोघरी स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:50 IST
जुनी शेमळी : गणेश विसर्जनानंतर भाद्रपद महिन्यात घरोघरी गुलाबाईची स्थापना केली जाते. साधारणपणे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तर काही ठिकाणी पंधरा दिवस गुलाबाईची स्थापना केली जाते. शनिवारी कसमादेत उत्साहात गुलाबाईची मनोभावे स्थापना करण्यात आली.
गुलाबाईची कसमादेत घरोघरी स्थापना
ठळक मुद्देमहिनाभर हा उत्सव साजरा केला जातो.