वटार : आज समाजातील असमानता पाहता काही लोकांच्या घरी सर्व सुखसुविधा उपलब्ध असतात. त्यांचे जीवन अगदी समृद्ध असते. त्याचीच दुसरी बाजू बघितली तर गरीब अनाथ मुलांना काबाड कष्ट करून जीवन जगावे लागत आहे. त्यात आईवडिलांचे छत्र हरपलेल्या तसेच निराधार मुलांना जीवनाची कोणतीही दिशा नसते. अशा बालकांसाठी बागलाण तालुक्यात प्रथमच महिला सन्मान संरक्षण बहुद्देशीय संस्थेने लोकसहभागातून अनाथाश्रमाची स्थापना केली आहे.समाजासाठी झटणारे योगी गुरु विनायक महाराज व आश्रमाचे संस्थापक सुशीलनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या अनाथाश्रमाची उभारणी करण्यात आली आहे. येथील आश्रमामध्ये भोजन, राहण्याची उत्तम सोय असून, आध्यात्मिक शिक्षण, शालेय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजातील गरीब, अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांनी याचा लाभ घ्यावा, असे योगी सुशीलनाथ महाराज यांनी सांगितले आहे.
बागलाण तालुक्यात अनाथाश्रमाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:11 IST