येवला : केंद्र सरकारने राष्ट्रीय व देशातील सर्व राज्य सरकारांनी राज्य कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अध्यापक भारतीतर्फे एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, क्रीडामंत्री यांच्याकडे केली आहे.भारतासारख्या खंडप्राय देशात कला-क्रीडा शिक्षण विकासासंदर्भात कोणताही ठोस धोरणात्मक कार्यक्रम नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. कला-क्रीडा शिक्षण, प्रशिक्षणाबद्दल केवळ शासकीय घोषणाबाजी होते. प्रत्यक्षात मैदानात कोणतीही कृती, नियोजन नसते. म्हणून इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ क्रमवारीत आणि नियोजन शून्यतेमुळे यशस्वी कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाच्या स्पर्धेतही नगण्यच असते. ही बाब शर्मेची असल्याने शाळा, महाविद्यालय पातळीवर खेळाचे प्रशिक्षण, विविध क्रीडा स्पर्धा यास योग्य मार्गदर्शन व पुरेशी आर्थिक तरतूद करून नवोदय विद्यालय आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय, राज्य सरकारांनी राष्ट्रीय-राज्य कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अध्यापक भारती सन २००६ पासून करत असल्याचे अध्यापक भारतीचे संस्थापक अध्यक्ष शरद शेजवळ यांनी म्हटले आहे.क्रीडापटू, क्रीडा मंडळे, संस्था, संघटना यांनी सदर राष्ट्रीय कला-क्रीडा विद्यापीठ स्थापना कार्यात सहभाग घेऊन आपल्या सूचना व कृतिशील सहभाग याबाबत सूचना करण्याचे आवाहनही अध्यापक भारतीचे प्रा. विनोद पानसरे, प्रा. के. एस. केवट, वनिता सरोदे, अतुल डांगळे, दीपक शिंदे, अक्षय गांगुर्डे, अभय लोखंडे, प्रशिल शेजवळ यांनी केले आहे.
राष्ट्रीय कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी अध्यापक भारतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 17:12 IST
येवला : केंद्र सरकारने राष्ट्रीय व देशातील सर्व राज्य सरकारांनी राज्य कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अध्यापक भारतीतर्फे एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, क्रीडामंत्री यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रीय कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी अध्यापक भारतीची मागणी
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ क्रमवारीत आणि नियोजन