शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थान संघर्ष समितीची स्थापना

By admin | Updated: September 2, 2016 00:45 IST

लढा देण्याचा निर्णय : देवस्थान समितीकडून अडवणूक

 देवळालीकॅम्प : पेशवेकालीन इनामाचा गैरअर्थ लावून शासकीय अधिकारी व देवस्थानचे पदाधिकारी यांनी संगनमताने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत शासकीय स्तरावर लढा देण्यासाठी देवस्थान संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.पेशवे काळात काळाराम मंदिर, बालाजी देवस्थान या मंदिराच्या वार्षिक दिवाबत्ती व धार्मिक कार्यक्रमासाठी लागणारा खर्च शिगवे बहुला, बेलतगव्हाण, विहितगाव या गावातून मिळणाऱ्या महसुलातून खर्च करण्याचा निर्णय त्या काळी घेण्यात आला होता. १९७२ नंतर या गावातील शेतजमिनींच्या उताऱ्यावर मूळमालक म्हणून देवस्थानची नावे लावण्यात आली. त्यामुळे मूळ शेतजमीन मालकांना जमिनीच्या मालकीपोटी दुय्यम दर्जा देण्यात आला. मात्र मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी विकण्यासाठी किंवा त्यांचा विकास करण्यासाठी देवस्थानची परवानगी घ्यावी लागते. यासाठी संबंधित देवस्थान पदाधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शिंगवे बहुला येथे या तिन्ही गावांतील शेतजमीनमालकांची बैठक छावणी परिषदेचे उपाध्यक्ष बाबूराव मोजाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. बैठकीत देवस्थानच्या नावे असलेल्या जमिनींचा शेतसारा संबंधित गावाच्या महसुलामधून अदा करणे गरजेचे असताना १० टक्के रक्कम भरल्याशिवाय ना हरकत दाखला दिला जात नसल्याबद्दल चर्चा करण्यात आली. जमिनींच्या अकृषक अथवा विक्री करण्याकामी परवानगीची गरज नसतानादेखील देवस्थानचे पदाधिकारी कारवाईचा बडगा दाखवत असल्याचा आरोप बैठकीत शेतजमीन मालकांनी केला. याविरोधात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला अंबादास निसाळ, रघुनाथ मोजाड, संतोष मेढे, अ‍ॅड. नंदकुमार फल्ले, दिनकर पाळदे, लियाकत काजी, पुंडलिक गावंडे, ज्ञानेश्वर निसाळ, लक्ष्मण पाटोळे, दशरथ मोजाड, शिवाजी मोजाड, विठ्ठल मेढे, सखाराम मोजाड, वसंत निसाळ, आदि उपस्थित होते. (वार्ताहर)