शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

नाशिक: निष्पाप प्राण्यांच्या जिवाला निर्माण होणार धोका टाळण्याबरोबरच त्यांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय प्राणी क्लेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

नाशिक: निष्पाप प्राण्यांच्या जिवाला निर्माण होणार धोका टाळण्याबरोबरच त्यांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय प्राणी क्लेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून प्राण्यांची वाहतूक, आजारी प्राणी तसेच इजा होणाऱ्या प्राण्यांच्या रक्षणासाठी समिती निर्णय घेणार आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाारी भागवत डोईफोडे यांच्या दालनात बैठक पार पडली.

जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत जिल्हा वन अधिकरी आनंद रेड्डी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे, सहायक आयुक्त डॉ. जी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विष्णू गरजे, पशुधन विकास अधिकारी डॉ. उज्ज्वल पवार, डॉ. वैशाली थोरात, महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य अरुण शिंदे, महेंद्र अहिरे, भारती जाधव, आशीष यमगर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती गठित करण्यात आली असून या समितीच्या अंतर्गत जिल्ह्यातील प्राण्यासंदर्भातील समस्या, सूचना व तक्रारींच्या अनुषंगाने लवकरच हेल्पलाइन क्रमांक व मोबाइल ॲप्लीकेशन कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे डोईफोडे यांनी सांगितले. जिल्ह्यात दररोज प्राण्यांबाबत काही प्रमाणात घटना घडत असतात, या घटनांमध्ये अनेक वेळा निष्पाप प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या प्राण्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. समितीमधील सर्व शासकीय व अशासकीय सदस्यांनी समन्वयाने प्राणी संरक्षणाच्या दृष्टीने कामाचे नियोजन करावे, अशा सूचना डोईफोडे यांनी दिल्या. वाहतुकीत प्राण्यांना होणाऱ्या वेदना, प्राण्यांची चढउतार करण्यासाठी रॅम्प तयार करणे, आजारी, वृद्ध, जखमी, पक्षी, प्राण्यांसाठी निवारा, पाणी, पांजारपोळची सोय करण्यात येणार आहे.

--इन्फेा--

समितीमध्ये सदस्य असे

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नरवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीमध्ये गौरव क्षत्रिय, भारती जाधव, शरण्या शेट्टी, महेंद्र अहिरे, नीलेश इंगळे, आशीष यमगर आणि अरुण शिंदे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.