चांदवड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात ७४ सार्वजनिक गणेश मंडळांची नव्याने स्थापना झाल्याची माहिती चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते व मंगेश डोंगरे यांनी दिली. चांदवड शहरात लहान १० मंडळे, तर मोठी २४ मंडळे अशी एकूण ३४ गणेश मंडळे आहेत, तर चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘एक गाव एक गणपती’ची ३५ मंडळे आहेत.या मंडळांच्या ठिकाणी चांदवड पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त ठेवला आहे. चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दल पुरुष, महिला यांनी तालुक्यातील सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. (वार्ताहर)
चांदवड परिसरात ७४ मंडळांची स्थापना
By admin | Updated: September 6, 2016 22:15 IST