शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

प्रस्थापित प्रसारमाध्यमे विचारधारांसह जनमानसांपासून दुरावली

By admin | Updated: May 28, 2017 01:31 IST

नाशिक : भारतासह विविध देशांमधील प्रस्थापित प्रसारमाध्यमे पूर्वग्रहदूषित झाली आहेत.

नाशिक : भारतासह विविध देशांमधील प्रस्थापित प्रसारमाध्यमे पूर्वग्रहदूषित झाली आहेत. जनमाणसातील बदलणारे मतप्रवाह, भावना जाणून न घेता प्रसारमाध्यमे मर्यादित भूमिका मांडत असल्याने अमेरिकेसह भारत आणि देश-विदेशांतील प्रस्थापित प्रसारमाध्यमे समाजातील नागरिकांपासून व विचारधारेपासून दुरावत चालली आहेत. प्रसारमाध्यमे आणि लोकांमध्ये वैचारिक दरी निर्माण होत असल्याची खंत महाराष्ट्र राज्य विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी व्यक्त केली.शंकराचार्य न्यास, सिंधूताई मोगल संदर्भ ग्रंथालय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचार विभागातर्फे डॉ. कुर्तकोटी सभागृहात नारद जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार दत्ता सराफ व नरहरी भागवत यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी नारद पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, नारद जयंतीच्या निमित्ताने पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच वृत्तपत्रांना समाजातील विविध समस्यांबाबत अवगत करून देणाऱ्या वाचक पत्रलेखकांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. चंद्रकांत वाघुलीकर व छाया जाधव यांना पत्रलेखक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नितीन ठाकरे, विजय कदम व मिलिंद कांबळे उपस्थित होते.