४ जुलैपासून या स्पर्धा सुरू झाल्या असून, ९ ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. प्रशासक तथा तहसीलदार पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध , चित्रकला व छायाचित्रण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पारितोषिक देण्यात येणार आहेत. ‘माझ्या कल्पनेतील दिंडोरी ,पर्यावरण सुधारणा व संरक्षण काळाची गरज, पर्यावरणपूरक नावीण्यपूर्ण कल्पना, आपले राहणीमान व पर्यावरण’ या विषयांवर निबंध स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा दोन गटात होत आहे. शालेय विद्यार्थ्यांसह शहरातील नागरिक भाग घेऊ शकता.
चित्रकला स्पर्धेसाठी पर्यावरण, कोरोना विषाणू जनजागृती व दिंडोरी शहराचा ऐतिहासिक वारसा हे विषय देण्यात आले आहेेत. छायाचित्रण स्पर्धेसाठी दिंडोरी शहराचा सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक ऐतिहासिक वारसा आदी विषय दिले आहे.
स्पर्धेचे नियम
विद्यार्थ्यांनी रेखाटलेले चित्र व टिपलेले छायाचित्र आपल्या शाळेत जमा करावे. खुल्या गटातील स्पर्धकांनी निबंध / चित्र दिंडोरी नगरपंचायत कार्यालयात जमा करावे. छायाचित्र स्पर्धेकरिता स्पर्धकाने स्वतः टिपलेले छायाचित्र मूळ स्वरूपात स्वयंघोषणापत्र भरून सादर करावे, इंटरनेटवरील तसेच इतरांचे कॉपीराइट असलेले छायाचित्र ग्राह्य धरले जाणार नाही. असे स्पर्धेचे नियम असून, जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे.