शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडी प्रस्तावात त्रुटी

By admin | Updated: August 2, 2016 01:29 IST

आयुक्तांचे स्पष्टीकरण : आरोग्याधिकाऱ्यांकडून मागविला अहवाल

नाशिक : वादग्रस्त ठरलेल्या घंटागाडी ठेक्याच्या प्रस्तावात काही त्रुटी असल्याचे स्पष्टीकरण देत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्याबाबत आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविला असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, कचरा संकलनाची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यासाठी खतप्रकल्पावर स्वयंचलित वजनकाटा यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.महापालिकेच्या आरोग्य विभागाने घंटागाडीचा १७६ कोटी रुपयांचा पाच वर्षे कालावधीसाठी विभागनिहाय ठेका देणारा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला आहे. मात्र, सदर प्रस्तावाबाबत सत्ताधारी मनसेसह शिवसेनेने अनेक शंका उपस्थित करत ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यातच आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी पाच वर्षांत शहराची लोकसंख्या ९८ लाख गृहित धरून तयार केलेला प्रस्तावही हास्यास्पद बनलेला असताना आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले. आयुक्तांनी सांगितले, घंटागाडीच्या ठेक्याबाबत कोणत्याही अटी-शर्तीत बदल करण्यात आलेला नाही. मूळ निविदाप्रक्रियेत जी लोकसंख्या नमूद करण्यात आलेली आहे तीच स्थायीला सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात आहे. मुळात लोकसंख्येच्या बाबतीत प्रस्तावात त्रुटी आहेत. सन २००१ ते २०११ या कालावधीत शहराच्या लोकसंख्येत प्रतिवर्षी २.०३ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. मात्र, प्रस्तावात ५ टक्के वाढ नमूद करण्यात आलेली आहे. शहराची आजची लोकसंख्या सुमारे १७ लाखांपेक्षा अधिक नाही. सन २०११ मध्ये घंटागाडीची जी निविदाप्रक्रिया राबविली होती त्यावेळीही पाच टक्के लोकसंख्या वाढ गृहित धरण्यात आलेली होती. वास्तविक ती सुमारे दोन ते अडीच टक्क्यांच्या आसपास नमूद करणे गरजेचे होते. त्याबाबत त्रुटी असल्याने आरोग्याधिकाऱ्यांकडून संपूर्ण अहवाल मागविण्यात आला आहे. मुळात महापालिका लोकसंख्येच्या आधारे ठेकेदारांना देयके अदा करणार नसून कचरा संकलनावरच देयके निश्चित होणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे त्यावर नियंत्रण राहणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)