शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुक्यात इंटरनेट सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:51 IST

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला असून, नेटवर्क लिंक मिळत नसल्याने बॅँकांसह शासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या दळवट शाखा इंटरनेट सेवा तब्बल नऊ तास ठप्प झाल्याने आदिवासी बांधवासह महिलांना ताटकळावे लागले.

कळवण : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला असून, नेटवर्क लिंक मिळत नसल्याने बॅँकांसह शासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या दळवट शाखा इंटरनेट सेवा तब्बल नऊ तास ठप्प झाल्याने आदिवासी बांधवासह महिलांना ताटकळावे लागले. मंगळवारी (दि. २७) दिवसभर सकाळी ११ ते ५ व आज बुधवारी तीन तास नेटवर्क लिंक नसल्याने आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने मंगळवारी व बुधवारी अनेकांना माघारी फिरावे लागले. होळी सणाच्या उत्सवासाठी आदिवासी बांधवांनी मंगळवारी जिल्हा बॅँकेच्या दळवट शाखेत धाव घेतली होती. जिल्हा बॅँक आर्थिक संकटात असताना नेटवर्क लिंक होत होते. आता व्यवहार सुरळीत होत  असून, ग्राहकांचे समाधान  बॅँकेकडून केले असताना केंद्रीय सेवेचा बोजवारा उडाल्याने आदिवासी जनतेने नाराजी व्यक्त केली. तब्बल नऊ तासांनंतर नेटवर्क लिंक जोडले गेल्यानंतर बॅँकेने आर्थिक व्यवहारकेल्याने आदिवासी बांधवांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दळवट परिसरातील आदिवासी शेतकरी लघु, मोठे व्यावसायिक तसेच नोकरदार, सर्वसामान्य ग्राहकांसाठी जिल्हा बॅँकेची शाखा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने या बॅँकेतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. शिवाय बँकेचे कामकाज आॅनलाइन झाले आहे. बुधवारी (दि. २८) सकाळी ११ वाजेपासून बीएसएनएल नेटवर्क लिंक होत नसल्याने जिल्हा बॅँकेच्या दळवट शाखेबाहेर आदिवासी ग्राहकांनी तब्बल तीन तास ठिय्या मांडला.

टॅग्स :Mobileमोबाइल