शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मुद्देमाल वाटप : सोनसाखळी, दुचाकी केल्या परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 01:11 IST

नाशिक : सोनसाखळी, दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटना शहरात घडत असतात आणि त्याबाबत नागरिकांमधून ओरडही होते. मात्र या घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणाही स्वस्थ बसत नाही तर गुन्हा नोंदविला गेल्यानंतर त्याचा तपास करत चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचाही प्रयत्न केला जातो. शनिवारी (दि.६) याचा प्रत्यय पुन्हा नाशिककरांना आला.

ठळक मुद्देचोरीस गेलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी पोलीस आयुक्तालय स्तरावरून सातत्याने प्रयत्न

नाशिक : सोनसाखळी, दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटना शहरात घडत असतात आणि त्याबाबत नागरिकांमधून ओरडही होते. मात्र या घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणाही स्वस्थ बसत नाही तर गुन्हा नोंदविला गेल्यानंतर त्याचा तपास करत चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचाही प्रयत्न केला जातो. शनिवारी (दि.६) याचा प्रत्यय पुन्हा नाशिककरांना आला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते सुमारे २० लाख २५ हजारांचा मुद्देमाल संबंधित मूळ मालकांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.दिवसेंदिवस शहर वाढत असून, विविध गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे; मात्र या गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी पोलीस आयुक्तालय स्तरावरून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची उकल होऊन चोरट्यांसह मुद्देमालही पोलीस हस्तगत करत आहे. चोरी गेलेला मुद्देमाल सलग तिसºयांदा अशा प्रकारे आयुक्तालयाकडून समारंभपूर्वक नागरिकांना परत करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘महाराष्टÑ टाइम्स’चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे उपस्थित होते. व्यासपीठावर उपआयुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे आदी उपस्थित होते.यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल तर सरकारवाडा पोलीस ठाणेच्या हद्दीतील वीस हजार, पंचवटीमधील एक लाख, गंगापूर हद्दीतील एक लाख २९ हजार, आडगावच्या हद्दीतील एक लाख वीस हजार, म्हसरूळमधील ५७ हजार तर मुंबईनाका हद्दीतील चोरी झालेला तीन लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, इंदिरानगरच्या हद्दीतील ४ लाख ८४ हजार रुपयांचा चोरी झालेला मुद्देमाल, उपनगरमधील ८०० हजार, नाशिकरोड-८३ हजार, सातपूर दोन लाख १८ हजार ५०० रुपये आणि अंबडच्या हद्दीतील ३ लाख ५३ हजार ५६४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत संबंधितांना परत केला. सूत्रसंचालन सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी केले. १९ दुचाकींचा लागला छडाचोरी झालेल्या दुचाकींपैकी १९ दुचाकींचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले. या दुचाकी मालकांचा शोध घेत शनिवारी दुचाकीची चावी समारंभपूर्वक प्रदान केली. आॅक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या दरम्यान, सर्वाधिक ४ दुचाकी सातपूरच्या हद्दीतील आहे, तर आडगाव, मुंबईनाका, नाशिकरोड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी झालेल्या प्रत्येकी तीन तर भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर पोलीस ठाण्यांमधील प्रत्येकी एक दुचाकीचा समावेश आहे.