शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गणरायांचे पर्यावरणस्नेही विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:01 IST

नाशिक : पीओपी मूर्ती, मूर्तीवरील रासायनिक रंग, निर्माल्य, गणेशोत्सव सजावट साहित्यातील थर्माकोल, प्लॅस्टिकची फुले यामुळे पर्यावरणाला पोहोचणारी हानी, प्रदूषित होणारे पाणी, जलचर प्राण्यांवर होणारा परिणाम या साºयांची जाणीव ठेवत यंदा नाशिककरांनी आपल्या घरगुती गणरायाचे पर्यावरणस्नेही विसर्जन करण्यावर भर दिल्याचे दिसून आले.

नाशिक : पीओपी मूर्ती, मूर्तीवरील रासायनिक रंग, निर्माल्य, गणेशोत्सव सजावट साहित्यातील थर्माकोल, प्लॅस्टिकची फुले यामुळे पर्यावरणाला पोहोचणारी हानी, प्रदूषित होणारे पाणी, जलचर प्राण्यांवर होणारा परिणाम या साºयांची जाणीव ठेवत यंदा नाशिककरांनी आपल्या घरगुती गणरायाचे पर्यावरणस्नेही विसर्जन करण्यावर भर दिल्याचे दिसून आले. शाडूमाती गणेशमूर्तींचे टपात विसर्जन, पीओपीच्या मूर्तींसाठी अमोनियम बायो कार्बोनेट पावडरचा वापर, मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान करीत नाशिककरांनी जबाबदार नागरिक असल्याचे आपल्या कृतीतून अधोरेखित केले आहे. मूर्तींबरोबरच निर्माल्यही नदी, तलावात न टाकता ते निर्माल्य कलशात, संकलन केंद्रात जमा करण्यावर त्यांनी भर दिला. यंदा जागरूक नाशिककरांकडून १ लाख ६९ हजार मूर्ती दान करण्यात आल्या. याचबरोबर बहुतांशी लोकांनी आपल्या घरातील गणेशाची मूर्ती अंगणात टपात, घंगाळ्यात बुडवून ती विरघळल्यानंतर ते पाणी झाडांना टाकत पर्यावरण रक्षणाला हातभार लावला. काही गणेशभक्तांनी विसर्जनस्थळी तयार केलेला कृत्रिम तलाव, टॅँकमध्येही गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन केले.घरच्या गणेशाचे असे पर्यावरणपूरक विसर्जन करून नंतर मिरवणूक पहाण्यासाठी कुटुंबीयांसह शहरात आपला मोर्चा वळवला. सोमेश्वर, पंचवटी, नाशिकरोड आदी ठिकाणी मूर्ती व निर्माल्य दान करणाºया गणेशभक्तांना प्रोत्साहन देण्याचे कामही त्यांनी आवर्जून केले. बºयाच नागरिकांनी गणेशोत्सव काळात जमा झालेले निर्माल्य खत पेटीत टाकण्यावर भर दिल्याचेही दिसून आले. अशाप्रकारे गणेशोत्सव काळात पर्यावरणाचा प्राधान्याने विचार करणाºया नागरिकांशी संवाद साधला असता पुढील काळातही हे धोरण कायम ठेवत पुढील पिढीलाही हा वसा देणार असल्याने त्यांनी स्पष्ट केले. ही जागरूकता अधिकाधिक नागरिकांमध्ये वाढायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.