शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’साठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक

By admin | Updated: October 25, 2015 22:47 IST

दीपेंद्रसिंह कुशवाह : निमामध्ये चर्चासत्र संपन्न

सातपूर : देशातील दहा शहरांचा सर्व बाजूंनी नाशिक शहराच्या तुलनेने सर्वेक्षण करून जिल्हा प्रशासनाला निमा किंवा अन्य संस्थांनी अहवाल सादर केल्यास त्याचा फायदा स्मार्ट सिटी करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले.निमा येथे आयोजित ‘नाशिक : गुंतवणुकीचे पुढील केंद्र’ या विषयावर चर्चासत्राप्रसंगी ते बोलत होते. नाशिक औद्योगिकदृष्ट्या परिपूर्ण शहर आहे. जमीन, पाणी, कुशल मनुष्यबळ, रस्ते, रेल्वे, मूलभूत सेवासुविधा यांसारख्या दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७ ते १५ दिवसांच्या आत सर्व प्रकारच्या परवानग्या देण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्योग क्षेत्रासाठी औद्योगिक संस्थांनी ३०० ते ५०० एकर जमीन सुचविल्यास त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ती जमीन हस्तांतर करण्यासाठी राज्य सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, अशीही ग्वाही जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिली. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीसाठी निमा या औद्योगिक संस्थेने देशातील बंगळुरू, अहमदाबाद, पुणे, बडोदा, औरंगाबाद, नागपूर यांसारख्या १० शहरांचा तुलनात्मक सर्वेक्षण करून अहवाल दिल्यास त्याचा नाशिकसाठी फायदा होईल, असेही आवाहन त्यांनी केले.यावेळी बॉश कंपनीचे उपाध्यक्ष अविनाश चिंतावार, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण अहेर, ऋषभ कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया, सॅमसोनाईटचे वाय. एम. सिंग, नाशिक इंजिनिअरिंग ब्लस्टरचे अध्यक्ष विक्रम सारडा, निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, व्हिनस वाणी आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मधुकर ब्राह्मणकर, नगरसेवक शशिकांत जाधव, निशिकांत अहिरे, मंगेश पाटणकर, ज्ञानेश्वर गोपाळे, हर्षद ब्राह्मणकर, समीर पटवा, सुधाकर देशमुख, मिलिंद राजपूर, प्रमोद पुराणिक, जितुभाई ठक्कर आदिंनी चर्चेत भाग घेतला. यावेळी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)