शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड परिसरातही उत्साह

By admin | Updated: January 23, 2015 23:59 IST

गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक

नाशिकरोड : देवळालीगाव सार्वजनिक पार श्री सूर्यमुखी गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. श्री गणेश जयंतीनिमित्त देवळालीगाव सार्वजनिक पार श्री सूर्यमुखी गणेश मंदिरात आज पहाटे सनई वादन, मांडव डहाळे आदि धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी १० वाजता देवी चौक, दंडे अलंकार येथून प्रथेप्रमाणे गणेश पालखी मिरवणूक शिवाजी पुतळा, बिटको पॉर्इंट, मुक्तिधाममार्गे देवळालीगावापर्यंत काढण्यात आली होती. पालखी मिरवणुकीत एका चित्ररथावर देवदेवतांच्या वेशभूषा केलेले भाविक सहभागी झाले होते. पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दुपारी गणेश याग व सायंकाळी शिवा शाहीर कल्याणजी काळे पाटील यांचा कीर्तन व शाहिरीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, राजू लवटे, रामभाऊ जगताप, सुधाकर जाधव, शिरीष लवटे, श्याम खोले, नितीन चिडे, कृष्णा लवटे, सोमनाथ मोरे, प्रिन्सी लांबा, मनोहर कोरडे, चंदू महानुभाव, प्रमोद बुवा, राजेंद्र जाचक, मदन पाळदे, गंगाराम पवार आदि उपस्थित होते. आभार नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी मानले. विहितगाव येथील श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम येथे चतुर्मुख भव्य गणरायाच्या मूर्तीची अण्णा महाराज यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. जेलरोड मॉडेल कॉलनी गणपती मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती पालखी मिरवणुकीने झाली. यावेळी महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जेलरोड पिंटो कॉलनी चंद्रेश्वरनगर येथील गणपती मंदिरामध्येदेखील विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. (प्रतिनिधी)