शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

उत्साह : शिंगवेत गोदाकाठावरील भक्तिरंगाची सांगता ग्रामस्थांना ‘मांड्यांचे’ जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:22 IST

सायखेडा : अधिकमासाचे महत्त्व विशद करणारा अखंड हरिनाम सप्ताह शिंगवे येथे पार पडला. त्यानिमित्ताने भाविकांना धोंड्याच्या महिन्यात दिले जाणारे मांडे आणि आमरस यांचे जेवण तृप्त करणारे ठरले.

सायखेडा : अधिकमासाचे महत्त्व विशद करणारा अखंड हरिनाम सप्ताह शिंगवे येथे पार पडला. त्यानिमित्ताने भाविकांना धोंड्याच्या महिन्यात दिले जाणारे मांडे आणि आमरस यांचे जेवण तृप्त करणारे ठरले.गोदावरी नदीच्या काठावरील परमपूज्य शंकरपुरी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिराच्या पवित्र सान्निध्यात अधिकमासानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. विशेष म्हणजे सांगता समस्त ग्रामस्थांना मांड्यांचे जेवण देऊन झाल्याने ज्ञानरसाबरोबरच आमरसाच्या मेजवानीने ग्रामस्थांसह पाहुणेही तृप्त झाले.यानिमित्त दर तीन वर्षाने शिंगवेतील शंकरपुरी महाराज भक्त मंडळ (देवगल्ली), शंकरपुरी महाराज भजनी मंडळ व शिंगवे ग्रामस्थ विशेष अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करतात. दररोज अन्नदात्यांच्या सहकार्याने ग्रामस्थांना भोजन देण्यात येत होते. विशेष म्हणजे तानाजी रायते या युवा शेतकऱ्याने नफा-तोट्याचा विचार न करता सप्ताहासाठी जागा उपलब्ध करून दिली. अशा प्रकारे अनेकांचे सहकार्य या सप्ताहास लाभले.सप्ताहात वृषपूर्वा कदम, उत्तम महाराज बढे, विवेक महाराज केदार, सुधाकर महाराज वाघ, दीपक महाराज देशमुख, रोहिदास महाराज हांङे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांची कीर्तने झाली. तसेच रामायणाचार्य संदीपन महाराज रायते यांच्या रामायण कथेचं प्रवचन झाले. तर काल्याचे कीर्तन केशव महाराज उखळीकर यांनी केले.अधिकमास झाला गोडकाल्याच्या कीर्तनानंतर चुलबंद आवतान देत मांड्यांच्या जेवणाचा बेत ठेवला होता. आंबेरस, मांडे, सारभात, भजी, कुरडई असा महाप्रसादाचा मेनू होता. गाव तर जेवलेच पण पाहुण्यांनाही मांड्यांच्या जेवणाचे आमंत्रण दिले होते. दररोज गोदाकाठ रंगलेल्या भक्तीच्या रंगाबरोबरच मांड्यांच्या जेवणाने सांगता झाल्याने शिंगवेकरांचा अधिकमास अधिक गोड झाला.