शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी नवमतदारांमध्ये उत्साह

By admin | Updated: February 19, 2017 20:47 IST

महापालिकेच्या प्रचार तोफा थंडावल्या असून, सध्या मतदान करण्यासाठी नवमतदारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

नाशिक : महापालिकेच्या प्रचार तोफा थंडावल्या असून, सध्या मतदान करण्यासाठी नवमतदारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तरुण वर्ग आपल्या अमूल्य मतांबद्दल जागरूक झाल्याचे दिसून येते आहे. पहिल्यांदाच मतदान करीत असलो तरी आम्ही उत्साहाच्या भरात कोणालाही मतदान करणार नाहीत. आमचे मत विचार करूनच देणार, असा संकल्प नाशिकच्या नवमतदारांनी केला आहे. त्यामुळे तरु णाईचे हे मत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. महापालिकेसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान होत असून, गेल्या महिन्यापासून सुरू असलेला प्रचाराची रविवारी (दि.१९) संध्याकाळी ५ वाजता सांगता झाली आहे. आता गुप्त स्वरूपात उमेदवार मतदारांच्या गाठीभेठी घेत आहेत. अशाप्रकारे गुप्त प्रचार करणाऱ्या उमेदवारांचे प्रामुख्याने नवीन मतदारांवर अधिक लक्ष आहे. त्यामुळे नवीन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवारांकडून होत आहे. त्यासाठी विविध प्रकारची प्रलोभनेही दिली जाण्याची शक्यता आहे. परंतु, महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणवर्गाने आपला स्वाभिमान अबाधित राखण्याचा ठाम निश्चय केला असून, राज्यघटनेने दिलेल्या या अधिकाराचा पुरेपूर वापर करणार असल्याच्या प्रतिक्रिया पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी मिळालेल्या नवमतदारांनी दिल्या आहेत. नवीन मतदारांच्या संख्येत यावर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. या नवमतदारांच्या मतांवरही निवडणुकीचे चित्र पालटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे.