शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपात आउटसोर्सिंगने भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:30 IST

नाशिक : विविध सफाई कामगार संघटनांनी विरोध केल्याने अनेकदा महापालिकेने गुंडाळलेल्या सफाई कामगारांच्या भरतीचा विषय अखेरीच पुन्हा पटलावर आणला असून, आचारसंहिता संपताच अखेरीस सातशे सफाई कामगारांची कंत्राटी पद्धतीने (आउटसोर्सिंग) भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी ई-निविदाप्रक्रिया पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेनंतर कार्यवाही : महासभेचा छुपा ठराव अंमलात येणार

नाशिक : विविध सफाई कामगार संघटनांनी विरोध केल्याने अनेकदा महापालिकेने गुंडाळलेल्या सफाई कामगारांच्या भरतीचा विषय अखेरीच पुन्हा पटलावर आणला असून, आचारसंहिता संपताच अखेरीस सातशे सफाई कामगारांची कंत्राटी पद्धतीने (आउटसोर्सिंग) भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी ई-निविदाप्रक्रिया पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे सफाई कामगारांची भरती करण्याची वेळोवेळी चर्चा होत असते. महपालिकेला रोजंदारीवर भरती करण्याचे अधिकार असल्याचेदेखील सांगितले जाते. परंतु शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून साफसफाईची कामे कंत्राटी पद्धतीने करण्याचे आदेश दिल्याने यासंदर्भात महासभेवर वारंवार प्रस्ताव येतो आणि विरोधामुळे बारगळा जात असतो. महापालिकेत अशाप्रकारची कंत्राटी कर्मचाºयांची भरती करण्यासाठी प्रशासनाने १७ आॅक्टोबर २०१५ रोजी महासभेत प्रस्ताव सादर केला होता. मात्र, सफाईची कामे करणाºया सामाजिक संघटनांनी त्यास विरोध केला होता. त्यामुळे प्रशासनाचा मूळ प्रस्तावच बदलवून महासभेत १४०० अर्धवेळ सफाई कर्मचाºयांची महापालिकेने रोजंदारी अथवा मानधनावर नेमणूक करण्याचा ठराव महासभेने केला. तत्कालीन आयुक्तांनी महासभेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याने शासनाने तो निलंबित केला होता. त्यानंतर प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर १६ जून २०१६ रोजी तीन महिन्यांसाठी आउटसोर्सिंगद्वारे कर्मचाºयांची भरती करण्याचा प्रस्ताव सादर केला, परंतु महासभेने पुन्हा रोजंदारी अथवा मानधनावर भरतीचा ठराव केला आणि प्रशासनाच्या प्रस्तावाच्या विसंगत ठराव केला. तत्कालीन आयुक्तांनी हा प्रस्ताव विखंडनासाठी शासनाकडे पाठविला आहे. तब्बल २१ कोटी रुपयांचा खर्चकेंद्र सरकारने किमान वेतन कायद्यात सुधारणा केली असल्याने महापालिकेला ही भरती महागात पडणार आहे. ७०० कंत्राटी कर्मचारी भरण्याकरिता आउटसोर्सिंग करण्यात येणार असून, त्यासाठी २० कोटी ७० लाख रु पयांचा खर्च होणार आहे, मात्र अंदाजपत्रकात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शासनाने ६ मे २०१६ रोजी महापालिकेला आउटसोर्सिंगद्वारे भरतीचे आदेश दिले आहेत. त्याचा आधारे १० जानेवारी रोजी झालेल्या महासभेवर ७०० प्रस्ताव मांडला होता. महासभेच्या दिवशीदेखील सफाई कामगारांनी जोरदार आंदोलन केले, तर राजकीय पक्षांनी त्यास विरोध केल्याने हा प्रस्ताव स्थगित झाल्याचे सांगण्यात येत होते.महासभेत मात्र यानंतर या प्रस्तावाला गुपचूप मंजुरी देण्यात आल्याचे उघड झाले असून, त्याच आधारे आता या प्रस्तावाची अंमलबजावणी प्रशासन करणार आहे.