शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अन्न-औषध विभागाकडून प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:12 IST

अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मध्ये अन्न सुरक्षेला प्रथम प्राधान्य असल्याने या कायद्याविषयी आणि ग्राहकांचे आरोग्य त्याबरोबरच हॉटेलात काम करण्याच्या ठिकाणी अपेक्षित स्वच्छता याबाबत शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याचे पालन आणि दंड तसेच शिक्षेची तरतूद याविषयीदेखील माहिती देण्यात आली.

नाशिक : अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मध्ये अन्न सुरक्षेला प्रथम प्राधान्य असल्याने या कायद्याविषयी आणि ग्राहकांचे आरोग्य त्याबरोबरच हॉटेलात काम करण्याच्या ठिकाणी अपेक्षित स्वच्छता याबाबत शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याचे पालन आणि दंड तसेच शिक्षेची तरतूद याविषयीदेखील माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी सहआयुक्त यू. एस. वंजारी होते.हॉटेल एमराल्ड पार्क येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण, श्रीधर शेट्टी, शिवाजी जाधव, तेज टकले उपस्थित होते. बदलत्या परिस्थितीनुरूप तयार करण्यात आलेल्या अन्नसुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून ग्राहकांचे हित जोपसण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांचा संपर्क हा सर्व घटकातील आणि सर्व वयोगटातील लोकांशी येत असल्याने त्यांनी अधिक काळजी घेणे अपेक्षित आहे. अन्नाची सुरक्षितता ही प्रथम प्राधान्यावर असली पाहिजे, असेदेखील यावेळी अन्न विभागातील अधिकाºयांनी सांगितले.याप्रसंगी सहायक आयुक्त सी. डी. राठोड यांनी सांगितले की अन्नसुरक्षा व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची बाब असून याचा थेट संबंध नागरिकांच्या जीवनाशी येत असल्याने याबाबत सर्वांनी कायमच काळजी घेणे आवश्यक ठरते. तर अन्नसुरक्षा तेरकर यांनी सांगितले की, हॉटेल व्यवसायिकांनी ग्राहकांना कोणतेही पदार्थ पुरवितांना नियमाचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे. अन्नपदार्थातून कोणताही धोका निर्माण होणार नाही यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात यावी. दरम्यान, अशाप्रकरच्या कार्यशाळा नियमित घेण्याची मागणी यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी केली. नाशिक जिल्ह्यात भगर, तांदूळ व मिठाई उत्पादक यांच्यासाठी तीन कार्यशाळा घेण्यात आलेल्या आहेत. तसेच सुरक्षित प्रसाद वाटपासंदर्भात देवस्थान प्रशासनाचीदेखील बैठक घेण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अन्नसुरक्षा अधिकारी बाविस्कर, इंगळे, सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी आभार मानले. तर श्रीमती पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.