शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पावसाच्या दमदार सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:45 IST

विश्रांतीनंतर पावसाने रविवारी (दि.१०) दमदार सलामी दिली. भाद्रपदचे ऊन तापू लागल्यामुळे वातावरणात उष्माही जाणवत होता. कमाल तपमानाने तिशी ओलांडली आहे. अशा वातावरणात पावसाने दुपारपासून शहरासह उपनगरीय परिसरात टप्प्याटप्प्याने दिलेल्या सलामीमुळे नाशिककरांना दिलासा मिळाला.

नाशिक : विश्रांतीनंतर पावसाने रविवारी (दि.१०) दमदार सलामी दिली. भाद्रपदचे ऊन तापू लागल्यामुळे वातावरणात उष्माही जाणवत होता. कमाल तपमानाने तिशी ओलांडली आहे. अशा वातावरणात पावसाने दुपारपासून शहरासह उपनगरीय परिसरात टप्प्याटप्प्याने दिलेल्या सलामीमुळे नाशिककरांना दिलासा मिळाला.गणेशोत्सवाच्या अखेरच्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून पावसाची उपनगरीय परिसरात तुरळक हजेरी होती; मात्र शनिवारपासून पावसाने उपनगरीय परिसरात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. शनिवारी संध्याकाळी पावसाने वर्दी दिली. रविवारी दुपारी बारा वाजेपासूनच शहरात ढगाळ हवामान तयार झाले आणि थंड वाराही सुटला. क्षणार्धात टपोºया थेंबासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाथर्डी, वडाळागाव, अशोकामार्ग, डीजीपीनगर, भाभानगर, जुने नाशिकसह तिडके कॉलनी परिसरात मुसळधार पाऊस झाला; मात्र टिळकवाडी, शरणपूररोड, सीबीएस, पंचवटी, नाशिकरोड, मेरी, म्हसरूळ भागात कडक ऊन पडलेले होते. दुपारी तीन वाजेपासून पावसाला दमदार सुरुवात झाली. साडेचार वाजता पंचवटी परिसराला पावसाने झोडपले तर संध्याकाळी साडेपाच वाजेपासून सिडको, जेलरोडमध्येही पाऊस सुरू झाला.