सिन्नर: तालुक्यात गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी होते. त्यामुळे पशुपालकांना चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे.तालुक्याच्या पूर्व भागात जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण निर्माण झाला आहे. गतवर्षी खरीप व रब्बी हंगाम वाया गेल्याने शेतात चाऱ्याचे कोणतेही पीक घेता आले नाही. त्यामुळे शातात विविध पिकांच्या माध्यमातून येणारा चारा गेल्या दोन हंगामांत उपलब्ध झाला नाही. थोड्या फार प्रमाणात असणारा हिरवा चाराही संपुष्ठात आला आहे. तालुक्यात चारा छावण्या लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी पशुपालक शेतकरी यांच्याकडून होत आहे.
चारा छावण्यासाठी प्रशासनाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:42 IST