शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विजेचे स्थिर आकार रद्द करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:57 IST

सातपूर : वीजबिलातील स्थिर आकार रद्द करणे, केव्हीएच बिलिंग प्रणालीऐवजी जुन्या पद्धतीनेच बिल आकारणी करावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तर स्थिर आकार रद्द करण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन ऊर्जामंत्री राऊत यांनी दिल्याची माहिती चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.

ठळक मुद्देविजेचे स्थिर आकार रद्द करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन

सातपूर : वीजबिलातील स्थिर आकार रद्द करणे, केव्हीएच बिलिंग प्रणालीऐवजी जुन्या पद्धतीनेच बिल आकारणी करावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तर स्थिर आकार रद्द करण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन ऊर्जामंत्री राऊत यांनी दिल्याची माहिती चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.वीजदरासंदर्भात राज्यातील व्यापारी-उद्योजकांच्या अडचणींबाबत कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव व महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन ऊर्जामंत्री राऊत यांची भेट घेतली. यावेळी वीजबिलासंदर्भातील व्यापारी-उद्योजकांच्या अडचणी मांडण्यात आल्या. वीजबिलातील स्थिर आकार रद्द करणे, केव्हीएच बिलिंग प्रणालीऐवजी जुन्या पद्धतीनेच बिल आकारणी करावी, मराठवाडा व विदर्भाकरिता जाहीर केलेली सबसिडी त्वरित देण्यात यावी, वस्रोद्योगासाठी जाहीर केलेली वीजबिलाची सवलत पूर्वलक्षी पद्धतीने फेब्रुवारी २०१८ पासून देण्यात यावी. राज्यातील विजेचे दर शेजारील राज्यापेक्षा जास्त असल्याने उद्योगांना स्पर्धा करणे कठीण होते त्यामुळे वीजदर कमी करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच एप्रिल २०२० पासून लागू केलेल्या वीजदरवाढीच्या निर्णयास स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. ऊर्जामंत्री राऊत यांनी स्थिर आकार रद्द करण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.यावेळी कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, राजीव पाटील, सचिन शिरगावकर, रणजित शहा, मोहन गुरनानी, भावेश मानेक, सागर नागरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :MIDCएमआयडीसीelectricityवीज