शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात अखेर पीजी इन्टिट्यूटला मुहूर्त

By admin | Updated: December 22, 2016 00:34 IST

१५ दिवसांत होणार सोपस्कार पूर्ण : संशोधनाला मिळणार चालना; नाशिककरांकडून स्वागत

नाशिक : बहुप्रतीक्षेत असलेल्या पीजी इन्स्टिट्यूटला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या १५ दिवसांत सर्वसोपस्कार पूर्ण होऊन नाशिकच्या संदर्भ रुग्णालयात पीजी अभ्यासक्रम सुरू होणार आहे. यामुळे विद्यापीठाच्या संशोधनाला चालना मिळणार असून रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवादेखील मिळणार आहे.  मंगळवार दि. २० रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना ही माहिती दिली. नाशिकमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पी.जी. इन्स्टिट्यूट तर जळगावमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या पंधरा दिवसात या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळासमोर ठेवले जाणार आहेत. मंजुरीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर नाशिक विभागात दुसरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहील. सध्या धुळे येथे एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत आहे. जळगावमध्ये पदवी (एमबीबीएस) वैद्यकीय महाविद्यालय तर नाशिकमध्ये पी.जी. म्हणजेच पदव्युत्तर पदवी (एमडी, एमएस) अभ्यासक्रमाचे इन्स्टिट्यूट स्थापन होणार असल्यामुळे विभागाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाला चालना मिळणार आहे. नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी मागणी २० ते २५ वर्षांपासूनची आहे. विशेषत: आयएमए ही डॉक्टरांची संघटना याबाबत आग्रही आहे. राज्यातील इतर विभागात एकापेक्षा अधिक वैद्यकीय महाविद्यालये असताना नाशिक विभागात केवळ धुळे येथेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. दुसरे शासकीय महाविद्यालय नाशिकमध्ये असावे, अशी मागणी सातत्याने करण्यात आली; मात्र आता धुळे लगतच्याच जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे; तर नाशिकमध्ये पीजी. इन्स्टिट्यूट होणार असल्यामुळे भविष्यात वैद्यकीय महाविद्यालय मिळण्याचा मार्गही सोपा होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे नाशिककरांकडून स्वागत केले जात आहे.