नाशिकरोड : जयभवानीरोड गायकवाड पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या इमारतीतील मिठाई दुकानाचे सामासिक अंतरातील अनधिकृत दोन पत्र्याचे शेड व एका महिला संस्थेचे अनधिकृत कार्यालय मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केले. जयभवानीरोड गायकवाड पेट्रोलपंपालगत असलेल्या इमारतीत मारवाड मिठाई दुकानाच्या बाहेर सामासिक अंतरातील अनधिकृत दोन पत्र्याचे शेड व १० बाय १५ आकारातील लोडबेरिंग करून बांधलेले महिला विकास सामाजिक संस्थेचे कार्यालय बुधवारी सायंकाळी मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केले. अनधिकृत अतिक्रमण काढून घेण्याबाबत मनपाने नोटीस दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी अचानक कारवाई केल्याने अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून शहरातील काही भागातील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात आली. अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी याठिकाणी अतिक्रमण उभे राहत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
नाशिकरोड परिसरात अतिक्रमण हटविले
By admin | Updated: March 30, 2017 23:17 IST