शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाहीमार्गावरील अतिक्रमण हटविले

By admin | Updated: June 16, 2015 00:01 IST

पुरोहित संघाचे कार्यालय हटविले; काही काळ तणाव

पंचवटी : दोन महिन्यांवर सिंहस्थ कुंभमेळा असून, शाहीमार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे काम मनपा प्रशासनाने सुरू केले आहे. त्यातच पुरोहित संघाच्या ताब्यात असलेले वस्त्रांतरगृह तसेच पुरोहित संघाचे कार्यालय हटविण्यासाठी काही विशिष्ट महंत आणि पालिका पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मागणीवरून पुरोहित संघाच्या कार्यालयावर हातोडा पडणार असे मानले जात होते आणि प्रत्यक्षात तसेच घडले. सकाळी १० वाजता महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कडेकोट पोेलीस बंदोबस्तात हजर झाले. त्यानंतर रामकुंडालगत पुरोहित संघाने आपल्या कार्यालयाजवळ असलेल्या पायऱ्यांवर उभारलेल्या शेडचे पत्रे पथकाने हटविले. तत्पूर्वी पुरोहित संघाने शेडचे पत्रे काढून घेत शेडसाठी उभारलेले लोखंडी पाइप काढण्याचे काम सुरू केले होते; मात्र सकाळी अतिक्रमण पथकाने थेट रामकुंडावर धाव घेत लोखंडी पाइप गॅस कटरच्या सहाय्याने काढून घेण्याच्या कामाला सुरुवात केली त्यावेळी अनेकांनी विरोध दर्शविला मात्र प्रशासनाने पोलीस बळाचा वापर केल्याने जमावाला शांत बसावे लागले. त्यानंतर पथकाने गंगा गोदावरी मंदिराजवळील पुरोहित संघाच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. त्यावेळी पुरोहितांनी विरोध केला. ही खासगी जागा असल्याचा दावा करीत तशी कागदपत्रे त्यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अनेक पुरोहितांनी कार्यालयात ठाण मांडले असताना जेसीबीने शेड हटविण्यात आले. त्यामुळे अनेक पुरोहित जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत पुरोहितांना हटविले आणि त्यानंतर शेडही हटविले. यावेळी पुरोहित संघाचे पदाधिकारी संतप्त झाले व त्यांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून जवळच बांधलेली रामकुंड पोलीस चौकी अतिक्रमणात असून, तीदेखील हटविण्याची मागणी केली; मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करीत वाढीव बांधकाम व ओट्यांचे अतिक्रमण काढण्याचे काम सुरू ठेवले. याचवेळी एका युवकाने पथकावर दगडफेक केल्याने पोलीस संतप्त झाले आणि त्यांनी युवकाला ताब्यात घेतले. यावेळी वस्त्रांतरगृहाच्या समोर असलेल्या, तसेच नदीकाठच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाभिक व्यावसायिकांच्या टपऱ्या व यशवंतराव महाराज समाधी मंदिर, ढगे महाराज समाधी मंदिर परिसरात असलेल्या टपऱ्या, तसेच ओट्यांचे बांधकाम काढण्याचे काम केले. (वार्ताहर)