शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्रामच्या जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:26 IST

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले झोपड्यांचे अतिक्रमण हटवून आठवडा लोटत नाही तोच पुन्हा याच झोपडपट्टीधारकांनी पुन्हा त्याच जागेवर अनधिकृत झोपड्या, पाल उभारून मनपा प्रशासनाला आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण निर्मूलन विभागाचे दुर्लक्ष

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले झोपड्यांचे अतिक्रमण हटवून आठवडा लोटत नाही तोच पुन्हा याच झोपडपट्टीधारकांनी पुन्हा त्याच जागेवर अनधिकृत झोपड्या, पाल उभारून मनपा प्रशासनाला आव्हान दिले आहे.गेल्या आठवड्यात मनपा अतिक्रमण विभागाने साधुग्रामच्या जागेवरील शंभरहून अधिक अनधिकृत झोपड्या हटविण्याचे काम केले होते तर झोपड्या हटविताना काही महिलांनी मनपा अतिक्रमण पथकावर दगडफेक करून दहशत निर्माण केली होती.या प्रकारानंतर मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली खरी; परंतु काहींनी ऐनवेळी नमते घेतल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नव्हता.अतिक्रमण निर्मूलन विभागाचे दुर्लक्षशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्रामसाठी जागा आरक्षित केली असून, झोपडपट्टीधारक याठिकाणी वारंवार अनधिकृत झोपड्या थाटून मनपासमोर आव्हान उभे करतात. गेल्या आठवड्यात हटविण्यात आलेल्या झोपड्या पुन्हा थाटल्या गेल्या असल्या तरी सध्या या अनधिकृत झोपड्यांकडे पालिकेच्या पंचवटी अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अद्याप लक्ष गेलेले नाही.