शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

अतिक्रमणे मोकाट, मंडईत शुकशुकाट

By admin | Updated: December 5, 2015 22:53 IST

कृष्णकांत मंडई : पालिकेचे दुर्लक्ष; विक्रेते नाराज

इंदिरानगर : येथील सावरकर चौकात अनधिकृत भाजीविक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असून, तब्बल ७० ते ८० विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे जवळच असलेल्या कृष्णकांत भाजीबाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून, या मंडईतील विक्रेत्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार होत असून, अधिकृत भाजीबाजारातील विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्तकेली आहे. सावरकर चौक ते वनसंपदा कॉलनीदरम्यान गेल्या दहा वर्षांपासून व्यवसाय करीत होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने नागरिकांनाही त्रास होत होता. त्याची दखल घेऊन महापालिकेने कलानगर येथे लाखो रुपये खर्च करून भाजीमार्केट बांधण्यात आले. कृष्णकांत भाजीमंडई असे त्याला नाव देण्यात आले. तेथे ओटे बांधण्यात आल्याने रस्त्यावर विक्री करणारे सारेच तेथे स्थलांतरित झाले. याठिकाणी पाण्याची सुविधा आणि अन्य सुविधा असल्याने सध्या याठिकाणी सुमारे ४० ते ५० विक्रेते व्यवसाय करीत आहेत; परंतु रस्त्यावरील हे भाजीविक्रेते अधिकृत बाजारात स्थलांतरित झाले असताना आता मात्र मोठ्या प्रमाणात अनधिकृत भाजीविक्रेते याठिकाणी येऊन व्यवसाय करीत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून, संख्या २० ते २५ इतकी आहे. रस्त्याच्या कडेला अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या या विक्रेत्यामुळे येणारे नागरिक हे मंडईत जाण्यापेक्षा रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांकडूनच भाज्या खरेदी करतात आणि परत जातात. त्याचा फटका अधिकृत विक्रेत्यांना बसत असून, ग्राहकच येत नसल्याने त्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याने अधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेकायदेशीररीत्या व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना त्वरित मंडईत व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करावे अन्यथा मंडईतील विक्रेतेही रस्त्यावरच येऊन व्यवसाय करतील, असा इशारा या विक्रेत्यांनी दिला आहे.