शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

म्हसरूळ ते आंबेडकरनगरपर्यंतची अतिक्रमणे जमीनदोस्त

By admin | Updated: May 31, 2014 00:20 IST

माजी प्रभाग सभापतींचेही अतिक्रमण काढले : किरकोळ वादाचे प्रसंग

माजी प्रभाग सभापतींचेही अतिक्रमण काढले : किरकोळ वादाचे प्रसंग नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने म्हसरूळ ते आंबडेकरनगरपर्यंतच्या रस्त्याच्या पूर्वेकडील बाधित होणारी अतिक्रमणे शुक्रवारी जमीनदोस्त केली़ या मोहिमेची कोणत्याही प्रकारची सूचना न दिल्याच्या कारणावरून अतिक्रमणधारकांनी अधिकार्‍यांसोबत किरकोळ वाद घातला़ या मोहिमेत पंचवटीच्या माजी प्रभाग सभापतींचे पूर्वीचे संपर्क कार्यालय तसेच घरासमोरील अतिक्रमणही जमीनदोस्त करण्यात आले़ रस्त्यावरील सुमारे दोनशे अतिक्रमणे हटविल्याने रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे़दिंडोरीरोडवरील म्हसरूळ गावातील महापालिकेच्या कार्यालयापासूनच अतिक्रमणास सुरुवात होत होती़ आगामी सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून आरटीओ कॉर्नरपासून ते आरोग्य विज्ञान विद्यापीठापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील रुंदीकरणाचे काम जोराने सुरू असून, पश्चिमेकडील एका बाजूचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे, तर म्हसरूळ गावच्या रस्त्याच्या पूर्वेकडील अतिक्रमणे ही रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरत होती़ वडनगरजवळील भंगार मालाचे गुदाम व काही घरांनी तर रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले होते़मनपाचे सहायक आयुक्त एस़ डी़ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजेपासून या मोहिमेस सुरुवात झाली़ सर्वप्रथम म्हसरूळ येथील महापालिकेच्या घरप˜ी भरणा कार्यालयाचे अतिक्रमित पत्रे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले़ यानंतर म्हसरूळ तलाठी कार्यालय, माया हॉटेल, पाण्याची टाकी, हॉटेल रोहिणी, रसवंतीगृह, माजी प्रभाग सभापतींचे पूर्वीचे संपर्क कार्यालय, म्हसरूळचे बसस्थानक, वडनगर ते आंबेडकरनगरपर्यंतची रस्त्यावरील अतिक्रमणे यावेळी जमीनदोस्त करण्यात आली़ हॉटेल रोहिणीजवळ अतिक्रमणे काढण्यावरून अतिक्रमण अधिकारी व पंचवटीचे माजी प्रभाग सभापती व नगरसेवक अशोक बुरुंगे यांच्यात किरकोळ वाद झाला़ येथे नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शविली होती.या अतिक्रमण मोहिमेसाठी विभागाचे चार ट्रक, एक जेसीबी, ६० कर्मचारी, अधिकारी, पुरुष व महिला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ या मोहिमेदरम्यान वडनगरजवळ काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती़ या ठिकाणचे अतिक्रमण हटविल्यानंतर लगेचच जेसीबीने रस्ता रुंदीकरणाचे कामही सुरू करण्यात येत होते़ (प्रतिनिधी)बातमीला जोड आहे़