शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायतीचे सदस्यत्व रद्द

By admin | Updated: February 10, 2016 22:43 IST

अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायतीचे सदस्यत्व रद्द

सायखेडा : येथील ग्रामपंचायत सदस्य सारिका राजगुरू यांनी पदाचा गैरवापर करून सरकारी जागेत अतिक्रमण केल्याबद्दल त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिले आहेत.अर्जदार कृष्णा आघाव व इतर मयांनी सायखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य सारिका प्रकाश राजगुरू यांनी व त्यांच्या कुटुंबाने सरकारी जागेत अतिक्रमण केले म्हणून त्यांच्या विरोधात अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. अर्जात म्हटले आहे की, सारिका प्रकाश राजगुरू या सन २०१५ ते २०२० या कालावधीकरिता सायखेडा ग्रामपंचायतीमधून निवडून आलेल्या सदस्य आहेत. तसेच त्यांचे पती प्रकाश बाबूराव राजगुरू हे सन २०१० ते २०१५ या कालावधीमध्ये उपसरपंच होते. ते उपसरपंच असताना त्यांनी पदाचा गैरवापर करून सरकारी गट क्र मांक ४८७ मिळकत क्रमांक ६१३ या जागेत आरसीसी बांधकाम करून दुमजली इमारत बांधली. यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता फॅब्रिकेशनचा व्यवसाय करीत असून, सारिका राजगुरू व पती यांच्या संगनमताने ग्रामपंचायत सायखेडा यांचे गाव नमुना नं. ८च्या आकारणी यादीमध्ये प्रकाश बाबूराव राजगुरू व त्यांचा भाऊ कचेश्वर राजगुरू यांची नावे नोंदणी करून घेतली.(वार्ताहर)