शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राजीवनगर झोपडपट्टीतील फुटपाथवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:07 IST

राजीवनगर झोपडपट्टीलगत महापालिकेने तयार केलेल्या शंभरफुटी रस्त्याच्या दुतर्फा तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर पुन्हा एकदा अतिक्रमण करण्यात  आले असून, पादचाऱ्यांना फुटपाथ शोधण्याची वेळ आली आहे.

इंदिरानगर : राजीवनगर झोपडपट्टीलगत महापालिकेने तयार केलेल्या शंभरफुटी रस्त्याच्या दुतर्फा तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर पुन्हा एकदा अतिक्रमण करण्यात  आले असून, पादचाऱ्यांना फुटपाथ शोधण्याची वेळ आली आहे.  दोन्ही महामार्गास जोडणारा हा रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. राजीवनगर झोपडपट्टी एका खासगी जागेत असल्याने त्या ठिकाणी सुमारे आठशे ते हजार झोपड्या असून, त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून अनधिकृत झोपड्या बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शंभरफुटी रस्त्याचे काम अर्धवटस्थितीत पडून होते. अखेर सिंहस्थापूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन सुमारे साडेसहाशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्या. परंतु अतिक्रमण विभागाची पाठ फिरताच पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करून दुतर्फा पदपथ तयार करण्यात आले असताना त्यावर राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या शंभरफुटी रस्त्यावरील पदपथावर सुमारे सत्तर ते ऐंशी अनधिकृत झोपड्या बसल्या असून, या रस्त्याचा वापर करणाºया पादचाºयांना पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. या अनधिकृत झोपडपट्टीतील लहान बालके रस्त्यावर खेळत असल्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करणेही जिकिरीचे झाले आहे.हातगाड्या रस्त्यावरप्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे यांनी राजीवनगर झोपडपट्टीलगत असलेल्या पदपथांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळेस धारेवर धरले तरीही प्रशासनाला जाग आली नसून, आता तर पदपथावरून सर्रास रस्त्यावरसुद्धा हातगाडे विक्रेत्यांच्या गाड्या लागण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाEnchroachmentअतिक्रमण