शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविले

By admin | Updated: July 19, 2016 01:43 IST

कॉलेजरोड, त्र्यंबकरोडवरीलमनपाची कारवाई : हॉटेल, दुकानांवर हातोडा

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने सोमवारी कॉलेजरोड व त्र्यंबकरोवरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. यावेळी अनधिकृतपणे उभारलेली दुकाने आणि हॉटेलचे बांधकाम हटविण्यात आले.अतिक्रमण विभागाने त्र्यंबकरोडवरील दलूभाई पटेल कॉलनीतील वासंती अर्पाटमेंटमध्ये श्रीमती संगीता भोसले यांनी सामासिक अंतरात अनधिकृतपणे उभारलेल्या खोलीचे बांधकाम हटविले. त्यानंतर कॅनडा कार्नर येथील निर्मला अपार्टमेंटमधील भूपेंद्रसिंग, सुरेंद्रसिंग आणि लोटस फर्निशिंग यांनी इमारतीच्या सामासिक अंतरात भिंत आणि लोखंडी खांब उभे करत साकारलेल्या तीन दुकानांच्या बांधकामांवरही हातोडा चालविण्यात आला. सदर दुकानांच्या बांधकामांमुळे पार्किंगला अडथळा ठरत होता. कॉलेजरोडवरील युनायटेड आर्केड येथील भोगवटादार भावीन शाह, नवीनचंद्र जोशी आणि विवेक कुकरेजा यांनी इमारतीच्या सामासिक अंतरात लोखंडी अ‍ॅँगल्स आणि पत्रे वापरून रेस्टॉरंट उभारले होते. अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईसाठी गेले असता संबंधितांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेतले, तर उर्वरित बांधकाम मनपाने हटविले. याशिवाय, महापालिकेने पंचवटीतील साई टॉवर्स अपार्टमेंटमधील आशुतोष गोस्वामी यांनी टेरेसमध्ये व बाल्कनीमध्ये केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून काढून घेतले. पथकाने दिवसभरात एकूण सात अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही केली. (प्रतिनिधी)