शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

घाटे यांच्या तबलावादनाने रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:38 IST

उठाण, पेशकार, कायदे, रेले, तुक डे, चलन चक्रदारांसह पंडित विजय घाटे यांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील स्वतंत्र वादनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पवार तबला अकादमीतर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित तबलाविष्काराचे.

नाशिक : उठाण, पेशकार, कायदे, रेले, तुक डे, चलन चक्रदारांसह पंडित विजय घाटे यांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील स्वतंत्र वादनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पवार तबला अकादमीतर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित तबलाविष्काराचे.गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि.२२) ‘तबलाविष्कार २०१९’चे तिसरे पुष्प ख्यातनाम तबलावादक पंडित विजय घाटे यांच्या तबलाविष्काराने रंगले. तत्पूर्वी उद्योजक संजय देशमुख, भूलतज्ज्ञ डॉ. सुनीता देशमुख, एन. बी. जाधव, रवींद्र जाधव आणि रघुवीर अधिकारी, नितीन पवार आणि भास भामरे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने पुष्पाचा प्रारंभ झाल्यानंतर गौरव तांबे यांनी ताल त्रितालात स्वतंत्र तबलावादन सादर करताना पेशकार, कायदे, रेले, गत, तुकडे, चलन, चक्रदार वादनाचा आविष्कार सादर केला. त्यांना पुष्कराज भागवत यांनी साथसंगत केली. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ नृत्यांगना रेखा नाइगौडा यांनी कथक नृत्याविष्काराचे सादरीकरण केले. त्यांनी प्रारंभी गणेशवंदना सादर करतानाच ताल तीनतालात परंपरेनुसार थाट, आमद, परण, तोडे, तुकडे, तिहाई, चक्रदाराच्या कलाविष्काराने रसिकांची दाद मिळविली. त्यांना सुभाष दसककर, गायिका मधुरा बेळे यांच्यासह पढंत अदिती नाडगौडा-पानसे, सुजित काळे आदींनी साथसंगत केली. पंडित विजय घाटे यांच्या ताल त्रितालातील वादनाने तबालभिषेक सोहळ्याचा समारोप झाला. त्यांना अभिषेक शिनकर यांनी साथसंगत केली. सुनेत्रा मांडवगणे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक