शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सिंहस्थाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 26, 2015 00:04 IST

कार्यकर्त्यांच्या भावना : भाविकांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार

पंचवटी : दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील प्रमुख तीन शाहीस्नानाच्या पर्वण्या आटोपल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी केलेल्या सुखसुविधा काढून घेतल्याने प्रशासनाने एकप्रकारे सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगताच करून टाकली आहे. नाशिकला दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. साधारणपणे तेरा महिन्यांपर्यंत या सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व असले तरी प्रशासनाने केवळ प्रमुख तीनच पर्वण्यांना विशेष महत्त्व देऊन उर्वरित पर्वण्यांसाठी कोणतीही सुविधा केलेली नाही. कुंभमेळ्यासाठी पंचवीसशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असला तरी प्रशासनाने हा निधी केवळ पंचवीस दिवसांसाठीच वापरून एकप्रकारे उदासीनता दाखवून दिली आहे. प्रमुख तीन पर्वण्या संपल्यानंतर वर्षभरात अनेक महत्त्वाच्या पर्वण्या असल्या तरी त्या पर्वण्यांचे नियोजन नाही अन् येणाऱ्या भाविकांची कशाप्रकारे सोय करायची याचे नियोजनही प्रशासनाकडे नसल्याने कुंभमेळ्याच्या कालावधीत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केवळ चमकोगिरी केली असाच आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते शौचालय, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या होत्या; मात्र प्रमुख तीन पर्वण्या आटोपताच त्या काढून घेण्यात आल्या. आणखी शिवरात्री पर्वकाळ, वसंतपंचमी, अक्षयतृतीया या दिवशीही प्रमुख पर्वण्या आहेत, परंतु प्रशासनाने वर्षभराच्या प्रमुख पर्वण्यांची माहिती भाविकांपर्यंत पोहोचविलेली नाही. कुंभमेळ्याचा पर्वकाळ वर्षभराचा असल्याने भाविक त्यांच्या सोयीनुसार येतात; मात्र प्रशासनाने आगामी पर्वण्यांसाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही. कुंभमेळा हा केवळ साधू-महंत नाही तर भाविकांचाही आहे हे प्रशासनाने लक्षात घेणे गरजेचे आहे. (वार्ताहर)