नाशिक : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये राबविला जाणारा ‘रोजगार फळा’ हा उपक्रम शिवाजीनगर येथे राबविण्यात आला आहे. नगरसेवक दिनकर पाटील, लता पाटील यांनी या फळ्याचे लोकार्पण केले असून, या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांची वाढती फौज लक्षात घेऊन हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार फळा ही संकल्पना राबविली जात आहे. यावेळी नगरसेवक पाटील यांनी शिवाजीनगर हा परिसर प्रामुख्याने कामगारांची वसाहत म्हणून ओळखला जात असल्याने या भागात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रोजगार फळा अशा बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात फायदेशीर ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी अमोल पाटील, प्रवीण बोडके, किसन बिन्नर, संतोष तिवारी, शशी गांगुर्डे, गणेश गायकवाड, लक्ष्मण जपे, नीलेश लोखंडे, नीलेश देवगिरे, योगेश लोखंडे, आर. पी. सिंग आदि उपस्थित होते.
शिवाजीनगरला रोजगार फळा
By admin | Updated: October 21, 2015 22:20 IST