शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जॉब फेअरच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचा पुढाकार : १५०० हून अधिक उमेदवारांनी दिल्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:07 IST

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि इंजिनिअरिंग क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेरोजगार मेळाव्यास (जॉब फेअरचा) प्रतिसाद लाभला असून, १९ कंपन्यांमध्ये रोजगारासाठी एकूण १५०० बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदविला.

सिडको : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि इंजिनिअरिंग क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेरोजगार मेळाव्यास (जॉब फेअरचा) प्रतिसाद लाभला असून, १९ कंपन्यांमध्ये रोजगारासाठी एकूण १५०० बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदविला.अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पदवीधर ट्रेनी, पदव्युत्तर ट्रेनी, आयटीआय फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, शीटमेटल, ट्रेनी डाटा एन्ट्री, मेकॅनिकल इंजिनिअर व मॅन्युफक्चरिंग कामाचा अनुभव असलेले सीएनसी आॅपरेटर, केमिस्ट, सॉफ्टवेअर इंजिनिअर, रिसेप्शनिस्ट, कॅलिबरेशन इंजिनिअर, टूल मेकर आदी पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती जिल्हा कौशल्य विकास रोजगारचे सहायक संचालक एस. पी. चाटे, उपसंचालक सुनील सैंदाणे, प्रदीप गावित, नाशिक इंजिनिअरिंचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया, अशोक बंग, नरेंद्र बिरार, कुलकर्णी, अमोल येवले आदींसह महिंद्रा सी.आय.इ. अ‍ॅटोमोटीव्हचे योगेश बºहाटे, ईपीसी इंडस्ट्रीजचे बाबासाहेब पवार, डाटा मॅटक्सचे कमलेश पिसे, डब्ल्यूएनएसचे लतेश देवडीकर याबरोबरच महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, डी. जी. डाटा सोल्युशन, आर्ट रबर, फिनोटेक्स फायबरकास्ट आदींसह १९ कंपन्यांचे अधिकारी सहभागी झाले होते. या मेळाव्यासाठी ५०० रिक्त पदांसाठी जिल्ह्णासह इतर ठिकाणाहून १५०० हून अधिक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असल्याचे सांगण्यात आले.