नाशिक : स्थानिक स्तरावरील बेरोजगारांना रोजगाराची थेट माहिती मिळावी, यासाठी शहराच्या विविध भागात राबविल्या जात असलेल्या रोजगार फळा उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे आता आणखी संख्या वाढविली जात आहे. सिडकोत सुरू करण्यात आलेल्या रोजगार फळ्याचे उद्घाटन ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.युवा सक्षमीकरण व कलाभ्रमंती संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेला हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर गौरविला गेला आहे. सामान्यत: रोजगाराच्या छोट्या संधी या स्थानिक आणि अल्पशिक्षित वर्गापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्याचाच विचार करून युवा सक्षमीकरण आणि कलाभ्रमंती या संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे. शहरात पंचवटी येथे पंचवटी कारंजा आणि फुलेनगर तर सातपूर येथे शिवाजीनगर, तसेच सिडको येथील शिवपुरी चौकाजवळ फलक लावण्यात आले आहेत. सिडकोतील फलकाचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कलाभ्रमंतीचे शरद उगले आणि युवा सक्षमीकरणाचे प्रवीण बोडखे यांच्या हस्ते मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुंडे यांच्या उपक्रमांचे कौतुक केले.
बेरोजगारांना उपयुक्त ठरतो ‘रोजगार फळा’
By admin | Updated: October 21, 2015 22:23 IST