शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतील सफाई कर्मचाऱ्यांची पदे गोठवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:28 IST

राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅन्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाऱ्यांची पदे गोठविण्यात आली आहेत.

ठळक मुद्दे१५० कर्मचाऱ्यांना आता इतर विभागांत ढकलले जाणार २० महिन्यांपासून वेतन कराराचा प्रश्न प्रलंबित

खासगीकरणाचा फटका : एसटी महामंडळाचा निर्णयनाशिक : राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅन्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाऱ्यांची पदे गोठविण्यात आली आहेत. महामंडळाच्या स्वच्छता विभागाचे खासगीकरण करताना या विभागात काम करणाऱ्यांची पदे गोठविण्यात आल्याने नाशिक विभागात काम करणाऱ्या सुमारे १५० कर्मचाऱ्यांना आता इतर विभागांत ढकलले जाणार आहे.राज्य परिवहन महामंडळात सध्या वेतन करार तसेच एसटीला होणारा तोटा या भोवतीच संपूर्ण राजकारण फिरत आहे. त्यामुळे २० महिन्यांपासून वेतन कराराचा प्रश्न प्रलंबित आहे. दुसरीकडे एसटी तोटादेखील जाहीर केला आहे, असे असताना महामंडळात मात्र खासगीकरण आणि नूतनीकरणाबरोबरच खरेदी, पदभरतीच्या संदर्भात अनेक निर्णय घेतले जात आहेत. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्येच संभ्रमावस्था असून, खासगीकरण आणि कंत्राटीकरण पुढे येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व डेपोंमधील बसची स्वच्छता तसेच सफाई कामांचे कंत्राटीकरण केलेले आहे. सुमारे ४५० कोटींचा हा कारार करण्यात आल्याची चर्चा असून, नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे १२५ कोटींचे कंत्राट देण्यात आल्याचे समजते. कंत्राटदाराला स्वच्छता कामासाठी त्याच्याकडील कर्मचारी नियुक्तीची परवानगी असल्याने खासगीकरणातून त्यांनी काही कर्मचारी कामावरही आणले आहेत. परंतु मूळ एसटीतील स्वच्छता आणि सफाई कर्मचारी म्हणून रुजू झालेली आणि रुजू होणाºया अनुकंपातत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण ही पदे आता एसटीच्या आस्थापनेवरून गोठविण्यात आली असल्याने अनुकंपावरील कर्मचाºयांच्या नियुक्तीचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.एसटीमध्ये ५ टक्के अनुकंपावरील कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. ही बहुतांश नेमणूक स्वच्छता आणि स्वच्छक कर्मचाºयांच्या रूपात होत असते. कारण अनुकंपाधारक म्हणून बहुतांश महिला आणि अल्पशिक्षित असतात. काहींचे वयदेखील अधिक असते. अशा कर्मचाºयांना एसटीतील इतर विभागांत काम देता येणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले जाते. परंतु आता स्वच्छता कामाचे खासगीकरण झाल्याने आणि सफाई कर्मचारी, स्वच्छकाची पदे गोठविण्यात आल्यामुळे यापुढे या पदांवर कोणतयही प्रकारची भरती होऊ शकणार नाही.--इन्फो--अनुकंपाधारकांचे कायनाशिक विभागात जवळपास १४०च्या जवळपास स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाºयांना इतर विभागांत वर्ग करण्याचे काम हळूहळू सुरू आहे, तर अनुकंपाधारकांना तसेच स्वच्छतेची कामे करणाºया कर्मचाºयांच्या हक्काच्या कामावर आता गदा आली आहे. ही कामे ठेकेदार करू लागल्याने एसटीच्या सेवेतून स्वच्छता कर्मचाºयांचा प्रश्न संपुष्टात आला आहे. त्यामुळे या वर्गाला कोठे सामावून घ्यावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.--अजब तोडगा--सफाई कर्मचाºयांची पदे गोठविण्यात आल्यानंतर या पदावरील विद्यमान कर्मचारी तसेच अनुकंपावरील कर्मचाºयांनी किमान दहावी उत्तीर्ण केली तर त्यांना कनिष्ठ सहायक म्हणून सामावून घेण्याचा अजब तोहगा महामंडळाने घेतला आहे. वास्तविक अनेक लोक चौथी पास नापास आहेत. काहींचे शिक्षण त्यापेक्षाही कमी आहे. अशा कर्मचाऱ्यांना विशेषत: महिला कर्मचाऱ्यांना या वयात परीक्षा देण्यास सांगणे वास्तव्यात शक्य नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.--कोट--कर्मचाऱ्यांवर अन्यायराज्य परिवहन महामंडळाने स्वच्छता कामाचे खासगीकरण केल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या रोेजगाराचा प्रश्न आहे. कर्मचाऱ्यांसाठी महामंडळानेच त्यांना ९० दिवसांचे ट्रेनिंग देऊन त्यांना कनिष्ठ सहायक म्हणून नोकरीची हमी दिली पाहिजे. स्वच्छतेची काही कामे पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहेत. त्या कामावरही हक्काने काम मिळणार नसेल तर नाराजी नक्कीच पसरेल. ही पदे न गोठविल्याने कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून घेतले पाहिजे.- नवाझ सय्यद, श्रमिक सेनाजिल्हा सरचिटणीस

टॅग्स :NashikनाशिकTravelप्रवास