शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी आगारात वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 23:46 IST

घोटी : राज्यभरात एसटी कर्मचाºयांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या अघोषित संपाला इगतपुरीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संपाच्या दुसºया दिवशी तालुक्यातील सर्व जवळपास अडीचशे कर्मचाºयांच्या वेगवेगळ्या संघटनांनी भाग घेत निषेध नोंदवला आहे.

ठळक मुद्देवेगवेगळ्या संघटनांनी भाग घेत निषेध नोंदवला

घोटी : राज्यभरात एसटी कर्मचाºयांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या अघोषित संपाला इगतपुरीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संपाच्या दुसºया दिवशी तालुक्यातील सर्व जवळपास अडीचशे कर्मचाºयांच्या वेगवेगळ्या संघटनांनी भाग घेत निषेध नोंदवला आहे.राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकचे अध्यक्ष भास्कर गुंजाळ यांनी इगतपुरी आगारात भेट देऊन अघोषित संपाला पाठिंबा जाहीर केला.राज्यात असलेल्या एक लाख दोन हजार कर्मचाºयांना तातडीने सातवा वेतन आयोग लागू करावा, १ जुलै २०१६ पासून वाढीव सात टक्के महागाई भत्ता द्यावा, जानेवारी २०१७ पासून वाढीव चार टक्के महागाई भत्त्याची थकबाकी तत्काळ द्यावी इत्यादी मागण्यांवर सर्व संघटना ठाम असून, यावर तोडगा काढण्यासाठी सर्व संघटनांचे पदाधिकारी मुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांच्यासोबत बैठकीतून तोडगा काढणार असल्याचे समजते.तालुक्यात या संपामुळे पन्नासच्या वर एसटी बसेस बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण विस्कळीत झाले असून, ऐन शाळा भरण्याच्या मोसमात हा संप चालू झाल्याने विद्यार्थ्यांचे तसेच वृद्धांचे अतोनात हाल होत आहेत. या संपाबाबत लवकर तोडगा न निघाल्यास राज्यात एसटी महामंडळाला याचा मोठा फटका बसणार आहे. त्यात हा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील एकशेएकवीस कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र हा संप लवकर मिटावा याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.