शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठातील  कर्मचारी टाकणार बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:09 IST

आरोग्य विद्यापीठातील कर्मचारी आंदोलनापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्तविद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाºयांच्या संघटनेने समस्यांबाबत उचल घेतली आहे. कर्मचाºयांची वैद्यकीय सुविधा, बदल्या तसेच चौकशीधीन असलेल्या अधिकाºयांकडील कार्यभार यावर टीका करतानाच संघटनेने विद्यापीठाने या मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील आठवड्यापासून बहिष्कार टाकण्याचा निर्णय सोमवारी (दि.१२) झालेल्या महाराष्टÑ मुक्तविद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक : आरोग्य विद्यापीठातील कर्मचारी आंदोलनापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्तविद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाºयांच्या संघटनेने समस्यांबाबत उचल घेतली आहे. कर्मचाºयांची वैद्यकीय सुविधा, बदल्या तसेच चौकशीधीन असलेल्या अधिकाºयांकडील कार्यभार यावर टीका करतानाच संघटनेने विद्यापीठाने या मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील आठवड्यापासून बहिष्कार टाकण्याचा निर्णय सोमवारी (दि.१२) झालेल्या महाराष्टÑ मुक्तविद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचाºयांच्या प्रश्नांबाबत विद्यापीठाच्या पोर्चमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. विद्या-पीठातील ज्या प्राध्यापक, संचालक आणि कर्मचाºयांची चौकशी सुरू आहेत, त्यांच्याकडील कार्यभार तातडीने काढून घ्यावेत आणि चौकशी समितीचे अहवाल जाहीर करून त्यानुसार संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठातील सर्व कर्मचाºयांच्या वेतनातून २०१० पासून कर्मचारी कल्याण निधी अंतर्गत ६० व ३० रुपये विनासंमती बेकायदेशीररीत्या कापले जात असून, ही कपात थांबवावी आणि विनासंमती कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी करावी, कर्मचाºयांच्या हितासाठी विद्यापीठ फंडा-तूनच खर्चाची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यापीठाने कॅशलेससाठी शहरातील एका रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, ती अत्यंत चुकीची आहे. विद्यापीठाचे राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असताना शहरातील एकाच रुग्णालयाशी करार करणे गैर असून, तो तातडीने रद्द करावा, देशातील प्रमुख शहरात चालेल अशा रुग्णालयांची निवड करावी त्याचप्रमाणे विद्यापीठाचे बदली धोरण अत्यंत सोयीचे असून, आकसापोटी बदल्या करण्यात येतात तर काहींवर मेहरनजर दाखवून त्याच त्या विभागात बदली केली जाते, त्यामुळे निश्चित धोरण ठरवावे, कोणत्याही विनाजाहिरात करण्यात येत असलेली भरती रद्द करावी, शासनाला तातडीने कर्मचारी आकृतिबंध सादर करून पदोन्नतीसह अन्य प्रक्रिया राबवाव्या, अशा मागण्यांचे निवेदन कुलसचिव दिनेश भोंडे यांना देण्यात आले.आडमुठी भूमिका : जागा देण्यास नकारविद्यापीठाचा एक कर्मचाºयाची मुंबईत बदली करण्यात आली होती. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या कर्मचाºयाला नाशिकमध्ये बदली हवी असल्याने अर्ज केला होता, परंतु कर्करोग होऊनही त्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला नाही, अखेरीस त्याचा मृत्यू झाला. त्याविषयी बैठकीत तीव्र भावना करण्यात आला. विद्यापीठाच्या कर्मचाºयांना बैठकीसाठी जागा उपलब्ध न देण्यात आल्याने ही बैठक पोर्चमध्ये घेण्यात आली आणि प्रशासनाच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :universityविद्यापीठ