शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

बडतर्फीच्या भीतीपोटी इगतपुरी आगाराचे कर्मचारी कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 00:11 IST

इगतपुरी : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आक्रमक झाले असताना, जिल्ह्यातील इगतपुरी येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी मात्र संप मागे घेत प्रवाशांच्या सेवेसाठी तत्परता दाखवली आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांत दहशत : ग्रामीण भागात प्रवाशांसाठी सेवा सुरू

इगतपुरी : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आक्रमक झाले असताना, जिल्ह्यातील इगतपुरी येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी मात्र संप मागे घेत प्रवाशांच्या सेवेसाठी तत्परता दाखवली आहे. दरम्यान, आगारातील काही कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने बडतर्फीच्या नोटिसा बजावल्याने व खासदार हेमंत गोडसे यांच्या मध्यस्थीनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. कर्मचारी मात्र दहशत व भीतीपोटी यावर काहीही बोलायला तयार नाहीत.राज्यभरात एसटी महामंडळाच्या बव्हंशी कर्मचाऱ्यांनी एस. टी.चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठीसंप पुकारला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील महामंडळाचे आगार ग्रामीण भागातील प्रवाशांना सुविधा देण्यासाठी सुरू आहे. दहा दिवसांपूर्वी दिवाळीच्या काळात येथील कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे बससेवा ठप्प झाली होती. या संपात जवळपास २८५ कर्मचारी सहभागी झाले होते.मात्र यांतील काही कर्मचाऱ्यांना एस. टी. प्रशासनाने बडतर्फीची कारवाई करण्याच्या नोटिसा बजावल्यामुळे आणि कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याच्या भीतीने तसेच खासदार हेमंत गोडसे यांच्या मध्यस्थीने सदर संप मागे घेण्यात आल्याचे सांगितले जाते. इगतपुरी तालुक्यातील बससेवा ही वाडीवऱ्हे, टाकेद ते कसाऱ्यापर्यंत चालू असून ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांवरही प्रवाशांचीही ने-आण सुरू आहे. एस. टी. बस बाहेरगावी जात नसल्यानेइगतपुरी एसटी महामंडळाचे आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.इगतपुरी एस. टी. महामंडळाच्या आगारामध्ये कुठल्याही प्रकारे संघटनांनी व कर्मचाऱ्यांकडून आम्हाला बंदबाबत निवेदन प्राप्त झाले नाही. मात्र ग्रामीण भागात एस.टी.ची सेवा सुरू आहे.- संदीप पाटील, आगारप्रमुख, इगतपुरीकर्मचाऱ्यांनी संप पुकारला त्यावेळी जवळपास पाच दिवस आगाराचे कामकाज बंद होते. त्यात फक्त इगतपुरी व कळवण यांनीच आंदोलनाला सुरुवात केली होती. आमच्या दहा कमचाऱ्यांना निलंबनाच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र भीतीपोटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.- पीडित कर्मचारी

टॅग्स :Bus DriverबसचालकST Strikeएसटी संप