शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:30 IST

नाशिक : अनैतिक संबंधाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़टी़ पांडे यांनी शुक्रवारी (दि़ १८) चार वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

ठळक मुद्देलोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर केले

नाशिक : अनैतिक संबंधाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़टी़ पांडे यांनी शुक्रवारी (दि़ १८) चार वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ बाळू विश्वनाथ खिल्लारे, प्रदीप ज्ञानबा खिल्लारे व गजानन कुराडे अशी या आरोपींची नावे आहेत़ विंचूर गवळी शिवारात २७ फेब्रुवारी २०१५ रोजी ही घटना घडली होती़आडगाव पोलीस ठाणे हद्दीत विंचूर गवळी शिवारात नवजीवन पब्लिक स्कूलच्या मैदानावर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या कारणावरून आरोपी बाळू खिल्लारे, प्रदीप खिल्लारे व गजानन कुराडे यांनी मयत राजू लिंबाजी हिंगोले (३०, रा़ हाताळे, ता़ शेनगाव, जि़ हिंगोली) यास लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते़ उपचारादरम्यान हिंगोले याचा मृत्यू झाल्याने आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ आडगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आऱ पिंपरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून पुरावे गोळा केले होते़ न्यायाधीश पांडे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील संजयकुमार पाटील व वाय़डी़ कापसे यांनी आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर केले़ साक्षीदार यांनी दिलेली साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश पांडे यांनी शिक्षा सुनावली़ या खटल्यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी पैरवी अधिकारी पोलीस नाईक आऱ एस़ जोशी व पोलीस हवालदार एम़ के़ माळोदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला़