शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्विमा महामंडळातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:36 IST

नाशिक : केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी विमाधारकांच्या विरोधाला न जुमानता आयुर्विमा महामंडळातील निर्गुंतवणुकीसंबंधीचे विधेयक लोकसभेमध्ये मांडले असून त्यामुळे आयुर्विमा महामंडळाची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे. तसेच विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करण्यासंबंधीचे विधेयकही राज्यसभेमध्ये मांडलेले आहे. ही दोन्ही विधेयके देशातील कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक व त्यांचे भवितव्य असुरक्षित करणारे असल्याचा आरोप करीत सरकारच्या या धोरणास विरोध करीत आयुर्विमा महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. १८) संप पुकारत सर्व कामकाज बंद ठेवत शहरातील एलआयसी कार्यालयांमध्ये सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देघोषणाबाजी : निर्गुंतवणुकीकरण विमाधारकांसह अर्थव्यवस्थेलाही घातक असल्याची भूमिका

नाशिक : केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी विमाधारकांच्या विरोधाला न जुमानता आयुर्विमा महामंडळातील निर्गुंतवणुकीसंबंधीचे विधेयक लोकसभेमध्ये मांडले असून त्यामुळे आयुर्विमा महामंडळाची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे. तसेच विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करण्यासंबंधीचे विधेयकही राज्यसभेमध्ये मांडलेले आहे. ही दोन्ही विधेयके देशातील कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक व त्यांचे भवितव्य असुरक्षित करणारे असल्याचा आरोप करीत सरकारच्या या धोरणास विरोध करीत आयुर्विमा महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. १८) संप पुकारत सर्व कामकाज बंद ठेवत शहरातील एलआयसी कार्यालयांमध्ये सरकारविरोधात घोषणाबाजी केली.सरकारच्या या जनहितविरोधी धोरणाच्या विरुद्ध आयुर्विमा मंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी हा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात वर्ग एक अधिकारी फेडरेशन,नॅशनल फेडरेशन ऑफ वर्कर्स ऑफ इंडिया तसेच विमा कर्मचारी संघटना,नाशिक या संघटनांचे कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत सर्व कामकाज पूर्णपणे बंद ठेवले. रिझर्व्ह बँकेने बँकांना त्यांच्या विमा कंपन्यांमधील हिस्सा कमाल तीस टक्क्यांवर आणण्याचे निर्देश दिलेले आहेत. याचा विचार करता विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के केल्यास देशातील अशा विमा कंपन्यांवर मालकी, नियंत्रण व व्यवस्थापन परकीय विमा कंपन्यांचे निर्माण होऊन देशी विमा कंपन्यांकडून विमा घेतलेले लाखो विमाधारक त्यांची इच्छा असो वा नसो, ते आपोआप विदेशी विमा कंपन्यांचे विमाधारक होणार असल्याचा धोका यावेळी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त करतानाच देशातील कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक व त्यांचे भवितव्य असुरक्षित करणाऱ्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक अशा दोन्ही विधेयकांना तसेच सरकारच्या या अन्यायकारक धोरणाला सर्वस्तरातून विरोध करण्याचे आवाहन यावेळी नाशिक विमा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड कांतिलाल तातेड यांनी केले. याप्रसंगी विमा कर्मचारी संघटनेचे अनिरुद्ध देशपांडे, वर्ग एक अधिकारी फेडरेशनचे जितेंद्र भाटिया, नरेंद्र नागराज , सुदाम मस्के आदी उपस्थित होते.सरकारच्या विधेयकामुळे 'आयुर्विमा महामंडळा'चे रूपांतर 'कंपनी'मध्ये केले जाणार आहे. त्यामुळे विमाधारकांना सध्या प्राप्त असलेले घटनात्मक अधिकार संपुष्टात येणार असून हे धोरण देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारे आहे. विम्यामधील दीर्घकालीन गुंतवणूक असुरक्षित होणार आहे.-ॲड. कांतिलाल तातेड, अध्यक्ष विमा कर्मचारी संघटना ,नाशिक.

टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीStrikeसंप