शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वसाहतीत घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: May 20, 2017 00:56 IST

येवला : शहरातील दुहेरी सदनिकेजवळ म्हाडाने दलित वसाहतीत बांधून दिलेल्या सुमार दर्जाच्या घरकुल योजना परिसरात गटारी व सांडपाण्याची व्यवस्था नाही.

 लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शहरातील स्टेशन रोडवरील पालिकेकडे जाणाऱ्या, दुहेरी सदनिकेजवळ म्हाडाने दलित वसाहतीत बांधून दिलेल्या सुमार दर्जाच्या घरकुल योजना परिसरात गटारी व सांडपाण्याची व्यवस्था नाही. गटारीच नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. तुंबलेल्या पाण्यात घाण साचून परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. घाणीमुळे रोगराई पसरत असल्याने नागरिकाचे जीवनमान धोक्यात आले आहे. घरे आहेत पण शौचालये चालू अवस्थेत नाही. पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिसर घाण पाण्याने तुडूंब भरल्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डासांची उत्पत्ती वाढत आहे. वैद्यकीय उपचाराची वेळ येण्याअगोदर पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. नगरपालिकेने याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा मागणी केली असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.ड्रेनेज व्यवस्था व पाइपलाइन नसल्याने घरातील शौचालये कधीच चालू झाले नाही. घर, निवारा नसल्याने नाइलाजाने आम्हाला येथे राहावे लागते आहे. दलित वसाहत सुधारणा निधी नेमका जातो कुठे, असा सवाल येथील नागरिकांनी विचारला आहे.२००९ मध्ये या वसाहतीत १०० रुपयांच्या बंधपत्रावर तात्पुरता निवारा करण्यासाठी घरे दिलीत. १०८ घरांचे तात्पुरते वाटप झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या तात्पुरत्या लाभार्थींपैकी अनेकांकडे निवारा नसल्याने त्यांना येथे राहण्याशिवाय पर्याय नाही.म्हणून केवळ ६० ते ७० कुटुंब येथे राहतात. २०१० च्या पहिल्या पावसाळ्यात येथे कमरेएवढे पाणी साचले होते. आजतागायत प्रत्येक पावसाळ्यात अशीच परिस्थिती आहे.