शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत अंधाराचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:56 IST

उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक महिन्यांपासून बाजार समितीने बसविलेले पथदीप बंद असल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. बाजार समितीतील बंद पथदीपांमुळे शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत.

पंचवटी : उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक महिन्यांपासून बाजार समितीने बसविलेले पथदीप बंद असल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. बाजार समितीतील बंद पथदीपांमुळे शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत.गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्य आवारातील पथदीप बंद असल्याने ते सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी तसेच खुद्द संचालकांनी बाजार समितीकडे केल्यानंतरदेखील बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याने सध्यातरी पथदीप प्रश्न प्रलंबितच आहे. बाजार समितीत दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. शेकडो शेतकरी शेतमाल विक्रीसाठी सायंकाळी येतात. गेल्या काही दिवसांपूर्वी व्यापारी व शेतकºयांचे पैसे लुटल्याची घटना उघडकीस आली होती. सध्या सायंकाळी लिलाव होणाºया पटांगणातील अनेक पथदीप बंद असल्याने बाजार समितीत अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.चोरीच्या घटनाअनेक व्यापारी, आडत्यांनी आपापल्या व्हेजिटेबल कंपनीच्या बाहेर स्वखर्चाने विद्युत व्यवस्था केली आहे. बाजार समितीतील मुख्य आवारातील पथदीप बंद असल्याने शेतकºयांचा शेतमाल, पैसे, मोबाइल चोरणे यांसारख्या घटना घडण्याची दाट शक्यता असल्याने बाजार समिती प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन बंद पथदीप सुरू करावे, अशी मागणी शेतकरी, व्यापाºयांनी आणि काही संचालकांनी केली आहे.

टॅग्स :electricityवीजMarketबाजार