शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘नाशिक मध्य’मध्ये  सर्वच मतदान केंद्रांवर जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:23 IST

अनेक बडे नेते, आमदार-खासदारांचे वास्तव्य असलेल्या नाशिक मध्य मतदारसंघात दिवसभरात प्रचंंड उत्साहात मतदान झाले

नाशिक : अनेक बडे नेते, आमदार-खासदारांचे वास्तव्य असलेल्या नाशिक मध्य मतदारसंघात दिवसभरात प्रचंंड उत्साहात मतदान झाले आणि सकाळपासूनच रांगा होत्या. जुने नाशिक गावठाण परिसरात किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले असले तरी अपेक्षेप्रमाणेच सायंकाळी मतदान संपण्याच्या वेळी बी. डी. भालेकर शाळेत एकच गर्दी झाली आणि त्यामुळे वेळ संपल्यानंतरदेखील साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते.नाशिक मध्य मतदारसंघातील पश्चिम प्रभागात मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मराठा हायस्कूल, उदोजी मराठा, व्ही. एन. नाईक, बॉइज टाउन, बीवायके, रचना विद्यालय अशा वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर सोमवारी (दि. २९) सकाळपासूनच मतदानाची गर्दी होती. ऊन वाढण्याच्या आत भल्या सकाळीच मतदान व्हावे यासाठी अनेक जण, तर जॉगिंग ट्रॅकवरूनच थेट मतदान केंद्रात आले होते. तरीही सकाळी रांगा दिसत होत्या. वाघ गुरुजी शाळेत सकाळी अर्धा ते पाऊण तास मतदानयंत्र बिघडल्याने झालेल्या व्यत्ययाव्यतिरिक्तमतदान सुरळीत पार पडले.जुन्या नाशिक म्हणजे गावठाण भागातदेखील सकाळपासून गर्दी होती. नॅशनल उर्दू हायस्कूल, डॉ. सुमंत नाईक शाळा, रंगारवाडा शाळा या भागात सकाळी ९ वाजेपासून महिलांनी गर्दी केली होती. सामान्यत: या भागातील मतदार केंद्रात महिला दुपारनंतर महिला येतात, परंतु यंदा सकाळीच महिलांनी मतदान उरकून घेतले.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलपखालरोडवरील सावित्रीबाई फुले या मतदान केंद्राच्या परिसरात मतदारांना पक्षचिन्ह असलेल्या स्लिपा देण्याचे प्रकार काही कार्यकर्त्यांकडे सुरू होते. त्याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक