शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बससेवेसंदर्भात आज तातडीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:21 IST

राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेच्या बससेवेबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निर्माण केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर महापालिकेने व्यक्त केलेली कायदेशीर अडचण या पार्श्वभूमीवर सर्व गटनेत्यांना विषयाची माहिती कळावी आणि विश्वासात घेऊन कामकाज करता यावे यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.२८) तातडीने सर्व गटनेत्यांची बैठक बोलविली आहे.

ठळक मुद्देमहापौरांचा पुढाकार : सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज

नाशिक : राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेच्या बससेवेबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निर्माण केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर महापालिकेने व्यक्त केलेली कायदेशीर अडचण या पार्श्वभूमीवर सर्व गटनेत्यांना विषयाची माहिती कळावी आणि विश्वासात घेऊन कामकाज करता यावे यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.२८) तातडीने सर्व गटनेत्यांची बैठक बोलविली आहे.महापालिकेच्या स्थापनेनंतर १९९६-९७ मध्ये केवळ बससेवा सुरू करण्याची तयारी केली होती. ती त्यावेळी कॉँग्रेस पक्षातील वादामुळे रद्द झाली असली तरी त्यानंतर आजपर्यंत तब्बल सहा वेळा नाकारण्यात आलेली बससेवा गेल्या भाजप-शिवसेना सरकारने महापालिकेच्या गळ्यात मारली. महापालिकेत आणि राज्यात याच पक्षाची सत्ता असल्याने हा विषय किरकोळ विरोध वगळता मंजूर झाला. त्यानंतर महापालिकेने बससेवेसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ अशी कंपनी स्थापन केली असून बससेवा चालविण्यास देण्यासाठी निविदा मागवल्या त्यानुसार आलेल्या कंपनीच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात प्रत्यक्ष बससेवा सुरू होणार असतानाच राज्यात सत्तांतर झाले आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बससेवेबाबत प्रश्न निर्माण केले. गेल्या आठवड्यात यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठक बोलावली होती. त्यावेळी महापालिकेने तोट्यातील ही सेवा सुरू करण्यास भुजबळ यांनी विरोध केला तर ही सेवा सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचे सोपस्कार पूर्ण झाले असून आता ही सेवा सुरू न झाल्यास ठेकेदाराला ८० टक्के भरपाई द्यावी लागेल, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तर पालकमंत्र्यांनी यावर महापालिकेने आर्थिक श्वेतपत्रिका काढावी, अशी सूचना केली आहे.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.२८) तातडीने गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. सद्य स्थिती गटनेत्यांना सांगून त्यांना विश्वासात घेऊनच कामकाज करण्यात येणार आहे.महापालिकेने बससेवेची तयारी केली असून काही राजकीय पक्षांचा तात्त्विक विरोध आहे. तथापि, महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने विरोध करून उपयोग झाला नव्हता. आता भुजबळ म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच विरोध केल्याने याबाबत काय निर्णय होतो, याकडे महापालिकेचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका