शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले यांचे विचार अंगीकारावे :  शोभा बच्छाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:21 IST

महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत. प्रगत वाटचालीसाठी फुले यांचे विचार जीवनात अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी केले.

नाशिक : महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत. प्रगत वाटचालीसाठी फुले यांचे विचार जीवनात अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी केले.  थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळी समाजसेवा समितीच्या वतीने परशुराम साईखेडकर सभागृहात समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ५६ व्यक्तींना समाजभूषण पुरस्कराने गौरविण्यात आले. व्यासपिठावर अध्यक्षस्थानी सुनील फरांदे होते. प्रमुख पाहूणे म्हणून कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, पंचवटी सभापती प्रियंका माने, नगरसेवक संतोष गायकवाड, अनंता सूर्यवंशी, डॉ. दौलतराव गांगुर्डे, चंद्रकांत बागुल, बाळासाहेब जानमाळी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बच्छाव म्हणाल्या, समाजाला सुधारण्यासाठी फुले यांनी दिलेले योगदान हे न विसरता येणारे आहे. स्त्रियांना शिक्षणाची कवाडे सावित्रीबाई यांनी जोतिबा फुले यांच्या साथीने खुली करून दिली. सुशिक्षित व सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांचे समाजकार्य हे नक्की आदर्श व प्रेरणादायी आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच आहेर यांनीही मनोगतातून फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी केले. सूत्रसंचालन योगेश कमोद यांनी केले.यांचा झाला गौरवविशेष सत्कारार्थी म्हणून गं. पां. माने, जी. जी. चव्हाण, सदाशिव माळी, बाजीराव तिडके आदींचा गौरव करण्यात आला. राजकीय : नगरसेवक समीना मेमन, सतीश खैरनार, मीनाक्षी कानडे, मालती गिते. शैक्षणिक गट : लक्ष्मण धोत्रे, निवृत्ती मंडलिक, अ‍ॅड. विनोद शेलार, जयंत बागुल, सचिन कळमकर. सामाजिक : छगनराव भंदुरे, सुनील वाडकर, राजेंद्र महाले, शंकर काठे, दीपक शेवाळे. पत्रकार : दत्तात्रय जाधव, दतात्रय शिंदे, शिक्षक : चंद्रकांत खैरनार, डॉ. मधुकर शिंदे. क्रीडा : लंकेश गाडेकर, समर माळी, कामिलभाई इनामदार आदी. आरोग्य- पर्यावरण : डॉ. गौरव खैरनार, देवांग जानी, डॉ. आबा पाटील, गुलाबराव माळी आदी. अधिकारी : रमेश शिंदे, गणेश फुलसुंदर, शरद सोमासे.‘व्हय मी सावित्रीबाई’ला उत्स्फूर्त प्रतिसादसोहळ्याच्या प्रारंभी सुषमा देशपांडे लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘व्हय मी सावित्रीबाई’ या एकपात्री नाटकाचे सादरणीकरण करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न रंगमंचावर करण्यात आला. या नाटकात दामिनी जाधव यांनी सावित्रीबार्इंची भूमिका साकारली.

टॅग्स :Nashikनाशिक