शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतून पावणे दहा लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:13 IST

----- शरणपूर रोडवरील घरफोडीत एक लाखाचा ऐवज लुटला नाशिक : शरणपूर रोडवरील साधू वासवानी रस्त्यावर असलेल्या पार्क अव्हेन्यू सोसायटीत ...

-----

शरणपूर रोडवरील घरफोडीत एक लाखाचा ऐवज लुटला

नाशिक : शरणपूर रोडवरील साधू वासवानी रस्त्यावर असलेल्या पार्क अव्हेन्यू सोसायटीत राहणारे चेतन गुलाबचंद राठी (४५) यांच्या बंद घराचे कूलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी मौल्यवान दागिने, रोकड असा सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये २० हजारांच्या रोकडसह १ लाखांची देवाची चांदीची भांडी, तसेच देवांच्या चार मूर्ती, तीन किलो चांदीच्या वस्तू चोरट्याने गायब केल्याचे राठी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

-------

हातचलाखी करत मोबाइल, रोकड हिसकावली

नाशिक : ‘आम्ही शिर्डी येथून आलो आहोत, तुला आशीर्वाद देत तुझे कल्याण करून टाकू,’ असे सांगत बोलण्यामध्ये मग्न करत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून हातचलाखीने संशयितांनी फिर्यादी अरुणकुमार रामकुमार गुप्ता (३२, रा. कौशंबी, उत्तरप्रदेश) यास ठक्कर बाजार बसस्थानकाच्या आवारात संशयित चोरट्यांनी गंडा घातला. त्याच्याजवळ असलेली एक हजाराची रोकड, मोबाइल हातचलाखीने काढून घेत पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुप्ता यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित शाहरुख नुरमंहमद मदारी (रा. मोंढा मार्केट, वैजापूर) यास अटक केली आहे. त्याचा साथीदार संशयित रशिद बुरा (रा. चाळीसगाव) हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फकिरीच्या वेशात हे दोघे बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांना गंडा घालत असल्याचे उघडकीस आले आहे.

-------