शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या निकषांवर आमदार नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:54 IST

जलयुक्तच्या निकषांवर आमदार नाराज

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी जिल्ह्णातील आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलण्याची जोरदार मागणी केली. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनांच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, त्याच गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भासल्यामुळे केलेला खर्च वाया गेला असून, अलीकडेच या योजनेसाठी नव्याने काढण्यात आलेला आदेशही बदलण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. नियोजन समितीच्या बैठकीत आमदार नरहरी झिरवाळ, जिवा पांडू गावित, निर्मला गावित यांनी हा मुद्दा उपस्थित केला. झिरवाळ यांनी जलयुक्त शिवार योजनेसाठी गावांची निवड केली जाते परंतु नाशिक जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, इगतपुरी, दिंडोरी व कळवण या भागांची एकूणच भौगोलिक परिस्थिती पाहता याठिकाणी सिमेंटचे बंधारे बांधण्याजोगी भौगोलिक परिस्थिती नाही, त्यामुळे तेथे माती बंधारे योग्य आहेत परंतु अशा प्रकारची कामे करण्यास अधिकारी उत्सुक नाहीत. जलयुक्त शिवार योजनेची कामे सीएसआरमधून केली जातात, त्यासाठी निधीही खर्च केला जातो; मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. या कामांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेतल्यास त्याचा उपयोग होईल, असे सांगितले. आमदार निर्मला गावित यांनी जलयुक्तच्या निकषांमुळे आदिवासी भागातील गावे, पाड्यांंवर कामे होत नाही.गेल्या वर्षात त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात काय कामे झाली याची माहिती अद्यापही आपल्याला दिली गेली नसल्याची तक्रार केली. जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलावेत यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार जिवा पांडू गावित यांनी, जिल्ह्णातील पश्चिम भाग खडकाळ व चढउताराचा असल्यामुळे या ठिकाणी जलयुक्तची कामे करूनही उपयोग नाही. जलयुक्तमध्ये एरिया ट्रीटमेंटला अधिक महत्त्व देण्यात आले असून, राज्यातील सपाट भूभागाचा विचार करून या योजनेचे निकष ठरविण्यात आले आहेत; मात्र जे भाग डोंगराळ व चढउताराचे आहेत तेथे ही योजना कशी राबविणार? असा सवाल त्यांनी केला. नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी अलीकडेच २३ जून रोजी जलयुक्त शिवार योजनेबाबत नवीन आदेश काढला आहे. त्या आदेशातील निकष व नियम पाहता आदिवासी भागात एकही काम होऊ शकणार नाही, त्यामुळे हा आदेश बदलण्यात यावा अशी मागणी केली. ज्या गावांमध्ये कामे केली तेथेच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.