शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ समर्थकांचा सरकारविरोधात एल्गार पक्ष, संघटनेचे बॅनर बाजूला : २ ला सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:41 IST

नाशिक : २१ महिन्यांपासून तुरुंगात असलेले आमदार छगन भुजबळ यांच्या विरोधात सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन निर्माण झालेला रोष व्यक्त करण्यासाठी निव्वळ भुजबळ समर्थक म्हणवून घेणाºया कार्यकर्त्यांनी गांधीमार्गाने २ जानेवारी रोजी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देभुजबळ यांच्यावर गुन्हा दाखलतहसील कार्यालयासमोर सत्याग्रह

नाशिक : २१ महिन्यांपासून तुरुंगात असलेले आमदार छगन भुजबळ यांच्या विरोधात सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन निर्माण झालेला रोष व्यक्त करण्यासाठी निव्वळ भुजबळ समर्थक म्हणवून घेणाºया कार्यकर्त्यांनी गांधीमार्गाने २ जानेवारी रोजी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील संदेश सोशल मीडियावर बुधवारपासून व्हायरल केला जात असून, त्याखाली कोणीही व्यक्ती अथवा पक्ष, संघटनेचे नाव नसून फक्त भुजबळ समर्थक म्हणवून घेणाºयांनी तो पसरवला आहे. महाराष्टÑ सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, भुजबळ तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाचे कलम ४५ अवैध ठरविल्याने भुजबळ यांना जामीन मिळावा यासाठी न्यायालयात करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सरकार भुजबळ यांना सूडबुद्धीने तुरुंगात अडकवून ठेवत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होत आहेत. संपूर्ण राज्यात एकाच प्रकारचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात यावे, असाही मतप्रवाह पुढे आला व त्यातून २ जानेवारी रोजी एकाच वेळी दिवसभर तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले आहे. या आंदोलनात कोणताही पक्ष, समाज, धर्म, संघटना व संस्थांच्या बॅनर्स, पोस्टर्सना दूर ठेवण्यात आले असून, निव्वळ भुजबळ समर्थक अशा एकच ओळखीतून सर्व जमणार आहेत.राज्यात बैठकांना ऊतराज्य सरकारला ताकद दाखवून देण्यासाठी २ जानेवारीचे सत्याग्रह आंदोलन यशस्वी करण्याचा निर्णय भुजबळ समर्थकांनी घेतला असून, राज्यभरात गुरुवारपासून बैठकांना सुरुवात झाली आहे. भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यात रविवारपासून तालुकानिहाय बैठका घेऊन सत्याग्रहाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे भुजबळ समर्थकांचे म्हणणे आहे.